‘ज्ञानेश्वर माउली तुकाराम’, टाळमृदंगाच्या गजराने अवघा परिसर दुमदुमला होता. भगव्या पताका खांद्यावर घेतलेले वारकरी तर डोक्यावर तुळशीवृंदावन आणि विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती घेऊन निघालेल्या महिला वारकरी वळणदार घाटातून मार्गस्थ होत असतानाचे दृश्य नयनमनोहरी होते. घाटाच्या दुतर्फी उंच डोंगराच्या कडेला उभे राहून पालखी सोहळा पाहणार्या हजारो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटलेच शिवाय डोंगर कपारीतील ‘हरण’देखील सुखेनैव धावत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दुपारी १२च्या सुमारास पालखी घाटाच्या पायथ्याशी आली आणि २च्या सुमारास रोटी गावच्या शिवेवर जाऊन पोहोचली.
वरवंड येथील मुक्कामानंतर पहाटे महाआरती झाल्यानंतर कौठीचा मळा, भागवतवाडी या ठिकाणचा पाहुणचार घेऊन पालखी सोहळा ८ वाजता पाटसच्या मुख्य चौकात आला. पंचक्रोशीतील नागरिकांचा पाहुणचार घेऊन ताजातवाना झालेला सोहळा गवळ्याच्या उंडवडीत मुक्कामी पोहोचला.
Source : Online Updates.