Salty Biscuits :
We use this salty biscuits at tea time. Salt, sugar, custard powder, milk powder and baking soda is used to make this salty biscuits. Make this recipe and enjoy the crispy salty biscuits.
साहित्य :– २५० ग्र्याम मैदा, एक कप कोमट दुघ, दोन टेबल स्पून कॉर्नफ्लोअर, दोन चमचे तूप, दोन छोटे चमचे मीठ.
कृती :- मैदा चालून घ्यावा, त्यामध्ये, तूप आणि मीठ टाकून, दुधा मध्ये भिजवावा, एक चमचा तूप आणि एक चमचा कॉर्नफ्लोअर, भिजवलेल्या पिठाला लावावे, आणि ते पिठ चांगले कुटावे, पिठाचे तीन सारखे भाग करून, त्यांच्या जाडसर पोळ्या लाटाव्या, पहिल्या पोळीला तूप आणि कॉर्नफ्लोअरचे मिश्रण लावावे, त्यावर दुसरी पोळी ठेवावी. दुसरी वरहि तेच मिश्रण लावून तिसरी पोळी ठेंवावी, त्याचा रोल बनवून त्या रोलचे छोटे तुकडे करावेत हे तूकडे हाताने दाबून छोडे चपटे करावे, ट्रेला तुपाचा हात लावून मैदा भुरभुरावा, त्यानंतर त्यावर तयार केलेले तुकडे, ठेऊन वीस ते पंचवीस मिनिट ओवन मध्ये बेक करावे. खुसखुसीत आणि स्वादिष्ट बिस्किटे तयार होतात.
Source :-
Marathi Unlimited
हेमावती म. भेंडारकर. नागपूर ९