साधना कशी करावी.
”साधना किंवा ध्यान” – कुठे व कश्या प्रकारे करावी ?
जिथे अग्नी वा पाणी यापासून काही धोका आहे, अश्या जागी, वाळक्या पानांनी झाकलेल्या जमिनीवर, वारूळानी भरलेल्या जागी, जंगली जनावरे असलेल्या जागी, चौरस्त्यावर, जिथे फार आवाज होत असेल अश्या स्थानी, भयावह ठिकाणी, जिथे फार दुर्जन वसतात अश्या स्थळी योग साधना करू नये.हा दंडक भारताला विशेषे करून लागू आहे. ज्या वेळी शरीर खूप आळसावलेले असेल, किंवा बरे नसेल, अथवा मन ज्या वेळी दुखी: कष्टी असेल त्या वेळी साधना करू नये शरीर अशुध्द असेल अश्या वेळा सुध्दा साधना करू नये. जिथे कोणी येऊन तुम्हाला त्रास देणार नाही अश्या एखाद्या चांगल्या निर्जन, गुप्त जागी जावून साधना करावी, अपवित्र जागी साधना करू नका, शांत सुंदर दृष्य असलेल्या जागी किंवा घरातील एखाद्या सुंदर स्वच्छ खोलीत बसून साधना करावी.
साधनेस सुरवात करण्यापूर्वी समस्त प्राचीन योग्यांना, स्वत:च्या गुरु देवांना आणि भगवंताना प्रणाम करून मग साधनेस प्रारंभ करावा. ध्यानाच्या काही पद्धती उदाहरणा दाखल सांगतात, सरळ बसा व आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी लावा.नासाग्री दृष्टी ठेवल्याने मन स्थिर एकाग्र होण्यास मदत होते असे आपणास आढळून येईल.डोळ्याच्या दोन्ही नाडयानवर ताबा मिळवू शकल्यास, प्रतीक्रियांच्या केंद्रावरदेखील बराच ताबा मिळू शकतो, आणि तद्दद्वारा ईच्छा शक्तीवर देखील आपला बराच ताबा चालू शकतो साधनेत असताना अशी कल्पना करावी कि तुमच्या मस्तकाच्या वरती एक पद्म आहे, धर्म त्याचा मध्य भाग आहे, ज्ञान त्याचे देठ आहे, योग्याच्या अष्टसिद्धी त्या पद्माच्या आठ पाकळ्या आहेत, आणि वैरागी त्याच्या आतील कोश आहे, आत मधील कोशाला परम वैरागी म्हणजे अष्टसिद्धीविषयी त्याग भावना मानण्यात आले आहे. त्या पद्माम्ध्ये तो हिरण्मय, सर्व शक्तिमान पुरुष विराजमान आहे असे स्मरण करा. “ओम” हे त्याचे नाव आहे. तो अनीवर्तनिय आहें, दैदिप्यमान प्रकाशाने वेढलेला आहें, त्यावर आपले मन केंद्रित करा, एक दुसरे प्रकार म्हणजे असे चिंतन करा कि आपल्या हृदया मघ्ये एक पोकळी आहें. त्या पोकळी मध्ये एक ज्योत तेवत आहें, ज्योत स्वतचा आत्मा आहें असे चिंतन करा ज्योतीमागे दैदीप्यमान प्रकाश विद्यमान असून तो म्हणजे परमात्मा स्वरूप ईश्वर होय.
Source : Marathi Unlimited Articles Section.