sadgun-ani-bhushan, articles, diffrence between sadgun ani bhushan, how to achive … Articles, marathi blogs, marathi readers blog, sadgun ani bhushan …
” सदगुण ” कवच धारणा.
जगात व्यक्तीची ओळख त्यांच्या गुणांच्या आधारानेच होत असते. एक गुणवान मनुष्य सर्वान कडून मैत्रीला व आदराला पात्र होतो. तो एखाद्या उदबत्ती प्रमाणे कणाकणाने जळत असतो व दूरदूर सुवास पसरवित असतो. दिव्या प्रमाणे सतत स्वत: तेवत राहून दुसर्यांना ज्ञानाचा प्रकाश देत असतो. तोआपल्या जीवनात खरी शांती व सुख अनुभवतो. गुणवान व्यक्तींचे स्मरण ईतरांना अनेक वर्ष असते. व ते त्याला अनुसरून वागत असतात. स्वर्गीय गुणांनी परिपूर्ण देवी देवतांचे आजही पूजन व वंदन करतात. पण अश्या गुणांच्या अभावामुळे सर्व जग अनियमित, अव्यवस्थित, संयम न पाळणारे नरकासारखे झाले आहे. सगळीकडे दु:खांचे व अशांतीचे ढग जमलेले आहेत. यात जर परिवर्तन करायचे असेल तर स्वत:हा पासून सुरवात करायला पाहीजे. प्रत्येकाने असा दृड निश्चय केला पाहीजे. स्वत:मद्ये परिवर्तन तरच विश्वात बदल होईल. आपण आपल्या संस्कारात बदल करून या जगात निश्चित परिवर्तन घडवून आणू शकतो. खरे तर जगाची हीच खरी सेवा आहे. स्वत:हाच सुधार करा.
* मानव स्वत:च्या जीवनाचा शिल्पकार आहे.
* सदगुणांचा साज शृंगार हाच आत्म्याचा खरा शृंगार आहे.
“भूषण” वाहता.
* मानव स्वत:च्या जीवनाचा शिल्पकार आहे.
* सदगुणांचा साज शृंगार हाच आत्म्याचा खरा शृंगार आहे.
“भूषण” वाहता.
भूषण म्हणजे शोभणारे, कीर्ती वाढविणारे, ऐश्वर्य व सौंदर्य वाढविणारे, पण हे सर्व मिळू शकते ते उत्तम चरीत्र्यातून, म्हणून उत्तम चरित्र हे भूषण आहे. स्वामी तुलसीदास म्हणतात, रात्रीचे भूषण चंद्र, दिवसाचे भूषण सूर्य, भक्तांचे भूषण भक्ती, भक्तीचे भूषण ज्ञान, ज्ञानाचे भूषण ध्यान, ध्यानाचे भूषण वाईटाचा त्याग, त्यागाचे भूषण शांती, दया, परोपकार ईत्यादी गुण होय. या सर्व भूष्णांनी जीवन भूषणावह बनते. ऐश्वर्याचे भूषण सज्जनता, शुरतेचे भूषण मित भाषण, ज्ञानाचे भूषण शांती, कुळाचे भूषण विनम्रता, धनाचे भूषण उचित कार्यासाठी खर्च, तपाचे भूषण क्रोध न करणे, बलवनताचे भूषण क्षमा व धर्माचे भूषण निश्चलता, व शेवटी या सर्वाचे भूषण म्हणजे शील म्हणजे उत्तम चरित्र होय. सदगुण व सतचारित्र्य हीच भूषणावहता आहे.
Source : Marathi articles.
1 Comment. Leave new
thank you very much….