मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोमवारी सकाळी ११ वाजता खासदारकीची शपथ घेत आपल्या राजकीय इनिंग्जला सुरूवात केली. राज्यसभा अध्यक्ष डॉ हमीद अन्सारी यांच्या दालनात सचिनचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी त्याची पत्नी अंजली तसेच काँग्रेसचे खासदार राजीव शुक्ला हेही उपस्थित होते. सचिनने हिंदीतून आपल्या पदाची शपथ घेतली. राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेणारा सचिन पहिला खेळाडू ठरला आहे.
दरम्यान शपथविधीनंतर सचिनवर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. बुद्धिबळ स्पर्धेत पाचव्यांदा जगज्जेतेपद पटकावणा-या विश्वनाथन आनंदने सचिनला शुभेच्छा देत हा सचिनच्या आयुष्यातील एक महत्वाचा क्षण असल्याच्या भावना व्यक्त केल्या. एक महान खेळाडू म्हणून नाव कमावलेला सचिन राज्यसभेतील आपल्या नव्या इनिंग्जचापण असाच आनंद लुटेल, असे तो म्हणाला. क्रिकेटच्या मैदानाप्रमाणेच तो राज्यसभेतही चांगली कामगिरी करून दाखवेल, असा विश्वास आनंदने व्यक्त केला.
Source : Online
Leave a Reply