१९ जुलैला होणार्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी संपुआतर्फे प्रणव मुखर्जी यांनी तर भाजपासह काही विरोधी पक्षांचे सर्मथन मिळालेल्या पी.ए. संगमा यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुखर्जी यांचा अर्ज दाखल करताना संपुआ अध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राहुल गांधी, मुलायम सिंह यादव, सतीशचंद्र मिश्रा, टी.आर. बालू, फारुख अब्दुल्ला, रामविलास पासवान, लालू यादव, अजित सिंग, डी.पी. त्रिपाठी यांच्यासह अन्य छोट्या पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संगमांसोबत भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी, नितीन गडकरी, अरुण जेटली, सुषमा स्वराज, मुरलीमनोहर जोशी तसेच प्रकाश सिंग बादल, शिवराजसिंह चौहान आणि मनोहर र्पीकर आदी नेते उपस्थित होते.
Source : Marathi Unlimited.