जी-२0 संघटनेतील सदस्य देशांनी जागतिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विकसनशील देशांतील पायाभूत उद्योगांत गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली दिली असून, भारतासाठी हे मोठे यश असल्याचे मानले जात आहे. जागतिक अर्थव्यवस्था व युरोझोन समस्या सोडविण्यासाठी भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी हा उपाय सुचविला होता.
विकासासाठी अनुकूल वातावरण करण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न वाढवू, त्याचबरोबर विकसनशील देशांतील पायाभूत उद्योगांत गुंतवणूक करू, असे आज या दोन दिवसीय परिषदेचा समारोप करताना १४ पानी जाहीरनाम्यात म्हटले आहे. जागतिक उत्पादनातील ८0 टक्के भाग हा पायाभूत उद्योगांच्या उत्पादनांचा असतो. दीर्घकाळात आर्थिक सुधारणा जलद गतीने होण्यासाठी या उद्योगांत गुंतवणूक फायद्याची ठरते, असा पंतप्रधानांचा संदेश होता.
पंतप्रधानांचे सूत्र मान्य
जागतिक मंदीमुळे विकसनशील देश समस्याग्रस्त झाल्याची आम्हाला जाणीव आहे. या देशांमधील पायाभूत उद्योगांना चालना मिळाल्यास जागतिक अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, हे सूत्र पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी समारोपाच्या भाषणात मांडले होते.
Source : Online News