निवडणूक खटला सुरूच राहणार : याचिका खारीज
चिदंबरम गोत्यात
राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही : गृहमंत्री
भाजपसह विरोधी पक्षांची राजीनाम्याची केलेली मागणीराजकीय हेतू प्रेरीत आहे. मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश माझासाठी नव्हे तर याचिकाकर्त्यानकरिता आहे. त्यामुळे मी मंत्री पदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नाचा होत नाही: पी चिदंबरम
शिवगंगा मतदारसंघातून २००९ मध्ये लोकसभेवर झालेली अपनी निवडणूक याचिका रद्द करावी यासाठी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनी केलेला अर्ज मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. मात्र निवडणूक गैरप्रकारांविषयी याचिकेत केलेले ऐकून ३० पैकी दोन आरोप न्यायालयाने काढून टाकले आहेत. त्यामुळे राहिलेल्या २८ आरोपां संदर्भाद चिदंबरम यांचावर खटला सुरूच राहणार आहे. हा निकाल पाहता भाजप तसेच इतर विरोधी पक्षांनी चिदंबरम यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती.
Source: Marathi Unlimited Team.