पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर २ रुपये ४६ पैशांनी कपात केली. ही दर कपात गुरुवारी मध्यरात्रीपासून लागू झाली. तेल कंपन्यांनी याच महिन्यात पेट्रोल दरात केलेली ही दुसरी कपात आहे. यामुळे कदाचित थोडाफार दिलासा ग्राहकांना मिळणार हे निश्चित आहे. या कपातीपूर्वी मुंबईकरांना प्रतिलीटर ७६.४५ रु. एवढी किंमत मोजावी लागत होती. तेल कंपन्यांनी मागील महिन्यात पेट्रोलच्या किमतीत प्रतिलीटर ७.५४ रु. एवढी मोठी वाढ केली होती. जागोजागी सुम्पूर्ण देशभरात निदर्शने खादली गेली त्यामुळेच हि भाववाढ घटवण्यात आली असे स्पष्ट होते.