अध्यात्मिक…नामस्मरण अति मोलाचं!




Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

namasmaran-ati-molache articles, das bodhanche wichar, dasbhodh kawya, latest articles, namasmaran, prayer to god, swami dasgnu yanche wichar sangrah, swami dasgunu, top …

 namsmaran bhgwantache

*प्रपंच्यातले प्रश्न घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला दासगणू महाराज प्रामुख्याने एकच उपदेश करीत असत तो म्हणजे, “ईश्वरावर श्रद्धा ठेवां आणि नामस्मरण चालू द्या.” चौर्यांशी लक्ष योनीतून मार्ग क्रमण केल्यावर फक्त एकदा नरदेह प्राप्त होतो.तो अतिशय दुर्मिळ व क्षणभंगुर आहे, ईतकच नाही तर नरकाच कोठार हि आहे. पण अखेर याच नरदेहात ईश्वर प्राप्ती होणार आहे, ”ईश्वरप्राप्ती” हेच नरदेहाच अंतिम ध्येय आहे, ज्या अव्यक्तातून आपण आलो आहोत, त्याच अव्यक्तात, पुन्हा समरसून जायचं आहे. एवढ असूनही या जगण्याचं आपल्याला कोण कौतुक! आपण आपल्या या नश्वर देहावर किती प्रेम करतो, त्या देहाला केवढ जपतो. त्याला सुख मिलाव म्हणून किती धडपडतो. हे सर्व चूक आहे अस नाही, पण त्याची आसक्ती हे वाईट. हि आसक्ती मग या देहाला कायकाय करायला भाग पडते.सारी धडपड या देहाच्या सुखाकरिता. आधी आस, मग ध्यास, आणि मग हव्यास, अश्या तर्हेने ती वाढतच जाते.काम,  रोध, लोभ, मोह, मत्सर हे षडरिपू या देहावर अधिराज्य गाजवतात आणि या सर्वांवर कडी करणारा ”अहंकार” किंवा”मीपणा ” हा जो ”मी” आहे ना, तोच जगातला सर्वात मोठा चमत्कार आहे तो दिसत नाही पण ‘आहे’ तर खरा !….

या अहंकारात किंवा आसक्तीत, आपण गुरफटून जातो. मग केव्हा तरी मृत्यूचा विळखा पडतो. आणि हा साडेतीन हाताचा देह संपुष्टात येतो. तरीही आपण ”अमरपट्टा” घेऊन आल्या सारखे वागतो. फायद्याच आहे ते मिळवायचचं, ते मिळवल्या नंतर मला समाधान लाभेल या कल्पनेन, मृगजळा मागे धावत राहतो. स्वार्थासाठी धडपडताना परमार्थाची साघी आठवनही होत नाही:आणि झाली तर ती आपली ईच्छापुर्ती करण्यापुरती! … यामुळे पापं आणि वासना नको तेवढ्या वाढत जातात. आणि माणूस शाश्वत आनंदाला कायमचा मुकतो. यातून वृद्धी होते ती चिंता, क्लेश, काळजी, ताणतणाव, आजारपण अनेक आपत्ती यांचीच! मग या सर्वांना तोंड देता आपल्या नाकीनव येतात.तेव्हा परमार्थ आठवूच शकत नाही, तर तो आठवावा, यासाठीच ” महाराज दासगणू”  आग्रहाने प्रतिपादन करतात, कि नामस्मरण करून या सर्वांच्या बाहेर पडता येतं  ” ऐहिक गोष्टींची अभिलाषा धरलीच पाहिजे का? मग ईश्वराचीच का धरु नये. त्यासाठी सर्वच संतांनी नामस्मरणाला खूपच महत्व दिले आहे.  सर्वं संतांच्या मुखी आपल्या साठी एकच आग्रहाच प्रतिपादन असते, अखंड नामस्मरण!  पण आपण वारंवार समजावूनही नको त्याच मार्गाने जात असतो, आणि अध:पतित होत असतो, दासगणू महाराज म्हणत  “नामस्मरण करण्यात कठीण काय आहे?” त्यात सोवळ्या ओवळ्याच, जातीधर्मांच, उच्चनीच्चतेच, स्थळकाळाच, कश्याचच बंधन नाही. हा मार्ग आचरायला एकदम सोपा आहे. मात्र त्यासाठी काही पत्थ्य आपणही पाळावी लागतात, ते म्हणतात ”नामस्मरण” हि काही नुसती कवायत नव्हे, तोंडाने राम, राम आणि मन मात्र दुसरीकडेच भरकटलेल. नामस्मरण हे  अंत:करणा पासून व्हायला हवं आणि त्यात ”सातत्य” हि हवं. ‘भगवंत आपल्या जवळ आहे हि भावना हवी. म्हणजे कुठलीही गोष्ट करताना विवेक शाबूत राहतो. आपल आचरण भगवंत पाहतो आहे, याची जाणीव असली की, नीती आणि सदाचार वेगळे राहत नाही. भक्ती हा नीतीचा गाभा आहे, सदाचार हि त्याची परिणीती आहे. चांगल्या वाईटातला फरक तरी आपल्या सदविवेकबुद्धीला करता यायला हवा. संत चरित्रात आपण पाहतो कि विवेका बरोबर ”वैराग्य”हि महत्वाचं प्रपंच्यात राहून पूर्ण वैराग्ययुक्त होण फार फार  कठीण, पण आसक्ती वर बर्यापैकी ताबा मिळवता आला, तरी परमार्थाची वाटचाल सुकर होईल, यात शंका नाही.

आपण मात्र सारखा परिग्रह करीत राहतो. कसला ना कसला लोभ, [पैशाचा,प्रसिद्धीचा] धरत राहतो. हे फार वाईट आहे, आणि त्याचा ”ईश्वराशी नाहक संबंध हि जोडतो”. त्यातून ईश्वराला घूस देण्याचा प्रयत्न देखील करतो, हे फारच वाईट आहे, त्याला द्यायचं आहे तर प्रेम द्या. तो भावाचा, भक्तीचा भूकेला आहे हे विसरू नका. परमांत्म्यात सतत ”अनुसंधान” हवं. त्याच्या साठी वेळ, आणि वयाचे हि बंधन नाही. संतांच्या या शिकवणीच पालन करणे हे आपलें नैतिक कर्तव्य आहे.

थोडक्यात म्हणजे ईश्वरावर निष्ठा ठेवून आणि विवेक बुद्धी शाबूत ठेवून नामस्मरण  करीत राहीलं, तर प्रपंच्यात राहूनही सहज पणे परमार्थ साधता येतो, आणि या नश्वर, क्षणभंगुर देहाचं सार्थक करून घेता येत. ज्यांनी हे ज्ञानामृत जनमानसात भरभरून वाटल आणि जनतेला त्या साठी सक्रीय केलं त्या  महापुरुश्यांना  कोटी कोटी प्रणाम!

स्वामी दासगणू.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
2




, , , , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा