moulik-anubhaw for marathi articles
सामाजिक, कौटुंबिक बांधिलकी — काळानुसार महत्वाचे वाचन, मनन, योग्य निर्णय —
जीवनातील वेगवेगळ्या अनुभवामुळे आपण किंवा समाज सुद्धा जेष्ठान कडे आदराने पाहतो. आपल्या संस्कृतीच्या जोपासलेले कार्य व त्यांचा प्रभाव याचा त्यांना चांगलाच अनुभव असतो. तसेच पुरातन ग्रंथान मधून हेच मौलिक अनुभव आपल्याला जेष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्ती समजविण्याचा प्रयत्न करीत असतात. माहाभारत युद्धात भीष्म पितामह शर शय्येवर असताना कौरवांच्या पराभवा नंतर युधीष्ठिराचा राज्याभिषेक झाला तेव्हा श्री कृष्णा सह पांडव पितामहांच्या दर्शनाला गेले, तेव्हा भीष्माचार्या नी श्रीकृष्णा ला नमस्कार करून स्वत:-ची जीवन यात्रा संपविन्याची ईच्छा व्यक्त केली. तेव्हा श्री कृष्ण म्हणाले ‘त्यापूर्वी आपण युधिष्ठिराला राजधर्माचा उपदेश ध्यावा’ तेव्हा पितामह म्हणाले, ‘ वासुदेवा तू असताना मी एक पराभूत योद्धा काय उपदेश करणार’? त्यावर श्री कृष्णाचे उदगार फारच मार्मिक आहेत ‘ पितामह मला ज्ञान आहे, परंतु तुम्हाला मौलिक अनुभव आहे. त्यामुळे उपदेश करण्याचा अधिकार तुमचाच. हे जे संस्कृतीचे जोपासलेले कार्य पुढल्या पिढी कडूनच व्हावयाचे आहे याची जाणीव ठेऊन सर्व धार्मिक कार्यांन द्वारे जेष्ठ व श्रेष्ठ व्यक्तींना समजावणे सहज शक्य आहे. हे जेष्ठ वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध यांनी राष्ट्रांसाठी तन, मन, धन समर्पित करण्याची भावना ठेवलेली आहे. कुटुंबात, आजी आजोबांचे काम म्हणजे सुसंस्कृतीचे पावित्र्य व संस्कार जपणे होय. नातवंड म्हणजे त्यांचा विरंगुळा जीव कि प्राण जणू दुधा वरची साय, त्यांच्या प्रेमाला जरा सुद्धा मोजमाप होणार नाही.आजी आजोबा हे ज्याच्या त्याच्या दैवानेच लाभतात.ते सध्याच्या पिढीला हवे आहेतच. वयो मर्यादे नुसार त्यांची मदत बऱ्याच कामात होत असते. नातवंडांचा अभ्यासघेणे, बाग काम, घरातील व्यक्तींच्या अडचणीवर उपाय शोधणे, घरातील किरकोळ दुरुस्तीचे काम करून घेणें, फोन बिल ईलेकट्रिक बिल भरणे, नातवांचे अभ्यास घेणें ईत्यादी बरीच कामे करून मदत होऊ शकते.
.
घरातील सण, कुळाचार कडे निट लक्ष देणे. घरातील वादविवाद टाळणे, आर्थिक नियोजन करणे, मुला सुनेच्या संसारात ढवळाधवळ न करता. चुकीच्या कामा विषयी आक्षेप नोंदविणे, मुख्यत्वे परिसरातील वुक्ष रोपण, सोसायटीच्या व्यवस्थापनात सेवाभावी मदत करणे, एखाद्या विषयावर अभ्यास पूर्ण लिखाण करणे, निवडणुकीत योग्य व लायक राष्ट्रहित जपणाऱ्या उमेदवाराला मदत करणे, अशी कित्येक कामे सांभाळू शकतात. आपले ज्ञान, शिक्षण, कला, ई. ईतरांसाठी वापर करणे, शेजारी काही जेष्ठ किंवा युवां मध्ये समस्या असल्यास समज देवून सोडविणे. अज्ञानी व्यक्तींना अर्थ व्यवस्थापणात मदत करणे. अशी कित्येक किरकोळ पण महत्वाची कामे करू शकतात. त्यात विरंगुळा होईल. आपण दुसरयाना मदत केल्याचे समाधान लाभेल. जेष्ठ नागरिकांनी त्यांची आर्थिक परीस्थिती चांगली असेल तर गर्जुना मदत करण्यास हरकत नाही.जन कल्याणासाठी त्या पैशाचा वापर करावा. आपण तडजोड करून सांभाळून ठेवलेली भांडवल किवा प्रापर्टी आपली पुढली पिढी त्याचा गैर वापर करत असेल तर त्या गुंतवनुकीला काहीच महत्व उरत नाही. तेव्हा त्या पैशाचा उपयोग महत्वाच्या किंवा उन्नतीच्या मार्गी लागावा असेच संस्कार मुलांत व नातवंडात उतरविण्याचा प्रयत्न करावा.निव्वळ पैसा जमा करणे हे लक्ष न ठेवता आपली आयुष्य भराची तडजोड हि कारणी लागावी व अनमोल ठरावी. हीच भावना मनी बाळगावी. आपला पैसा किंवा संस्कार पुढल्या पिढीचा सर्व नाश करत असेल तर त्या गुंतवणुकीला मायावी शस्त्र समजावे लागेल .
Article By : Marathi Unlimited.