अरबी समुद्रात रोडावलेल्या मॉन्सूनची आगेकुच होण्यासाठी अनुकुल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या ४८ तासात मॉन्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
सध्या मॉन्सूनने अंदमान-निकोबार बेट, बंगालच्या उपसागराचा अर्धा भाग, o्रीलंका येथील भाग पूर्णपणे व्यापला आहे. तेथे जोरदार पाऊस सुरू आहे. केरळमध्ये मॉन्सून दाखल होण्यास आणखी काही कालावधी शिल्लक असतानाच तेथे वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासात चेरापुंजी येथे ११0 मिमी, तेजपूर १६0, इटानगर ८0, मजबत ५0 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.
साधारणत: १ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होणार्या मॉन्सूनने यंदा उशीर केला. अरबी समुद्रातून आगेकूच करीत असताना हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तो रोडावला होता. मात्र हा पट्टा आता क्षीण झाला आहे. त्यामुळे मॉन्सूनला पुढे सरकण्यास अनुकुल स्थिती निर्माण झाली आहे.
News Source : Online