गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी २00४ मध्ये त्यांची खुर्ची टिकविण्यासाठी पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांच्या नातलगांच्या कंपन्यांना कच्छमध्ये ५0 हजार एकर जमीन कवडीमोल भावात बहाल केल्याचा आरोप मोदी यांचे एकेकाळचे सहकारी आणि महागुजरात जनता पार्टीचे अध्यक्ष गोवर्धन जडाफिया यांनी आज येथे केला. भाजपाच्या अनेक राष्ट्रीय नेत्यांना व त्यांच्या निकटवर्तीयांना मोदी यांनी केलेल्या जमीन वाटपाची चौकशी करण्याची मागणीच त्यांनी गुजरातच्या लोकायुक्तांकडे केली आहे.
भाजपाला सोडचिठ्ठी देऊन स्वत:चा पक्ष काढण्यापूर्वी मोदी सरकारमध्ये गृहराज्यमंत्री पद भूषविलेल्या जडाफिया यांनी आज मोदींना आरोपीच्या पिंजर्यात उभे केले. त्यांच्या दाव्यानुसार आर्चिन केमिकल्स आणि सोलारिस केमिकल्स या नायडूंच्या निकटवर्तीयांच्या कंपन्यांना मोदींनी ५0 हजार एकरांपेक्षा जास्त जमीन १५0 रुपये एकर दराने दिली.
Leave a Reply