manv-prakruti-ani-tyatil-gun for marathi article
मानव प्रकृती व त्यातील गुण
मानवाची सामान्य प्रकृती अज्ञान व्याप्त आणि बंधनांनी जखडून बांधलेली आहे; दिव्य अध्यात्मिक अस्तित्व मात्र कोणत्याही बंधनाच्या पलीकडील असून, अनिरुद्ध गतीमानेचे, कर्मण्यतेचे स्वातंत्र्य भोगते. सामान्य प्रकृतीच्या मानवास हे फार दुर्घट आहे. आज प्रकृती च्या तीन गुणांचा, गोंधळाचा पावलोपावली बंधनाची ठेच खाणारा व्यवहार जेथे चालला आहे, तेथे गुणांच्या बंधनातून सत्वगुण जोपासणे अतिशय कठीण झालेले आहे. मानवाचे, प्राण्याचे, शक्तीचे कोणतेही कार्य म्हणजे या तिन्ही गुणाचे {सत्व,रजो,तमो} एकमेकावरील कार्य होय, कार्य चांगले असो वां कोणतेही एक गुण प्रमुख असतो, बाकी दोन उणेअधिक असतात. कर्म म्हणजे तीन गुणाचे एकमेकावर घडणारे कार्य. कर्म करणे म्हणजे प्रकृती च्या तीन गुणाची गुलामी करणे, आणि चांगले कर्म करायचे म्हणजे, “सत्वगुण” याला शुध्दतम गुण मानायला पाहिजे. प्रकृतीचा शुद्धतम गुण म्हणजे ” सत्वगुण: हा गुण समता व संयोग घडवून आनणारा आहे, यतार्थ ज्ञान, यथोचित व्यवहार, सुंदर संवांदित्व, दृढसमतोल, कर्माचा योग्य नियम, स्वामित्त्वाचा योग्य प्रकार घडवून आणण्याचे सामर्थ सत्वगुणांत आहे: मनाला या गुणामुळे पूर्ण सामाधान व संतोष यांचा लाभ होतो.सामान्य प्रकृतीतील सर्वात श्रेठ वस्तू म्हणजे हा गुण होय. हा टिकून राहील, टिकवून धरता येईल, तोपर्यंत सर्व ठीक चालते, हा टिकून राहील याचा भरवसा फार कमी असतो, अनेक मर्यादा घालून या गुणांचा सांभाळ करावा लागतो, अनेक नियम आणि उपाधी सांभाळाव्या तेव्हा हा गुण टिकतो, यांचे ज्ञान आणि सुख तसे बेताचे व कनिष्ठ दर्जाचे असते, हा प्रकृतीचासर्वोत्तम गुण असतो. याचा उगम ज्या उच्च व दूरच्या स्थानी आहें, तेथे पूर्ण स्वतंत्र आत्म्यांचे श्रेष्ठ ज्ञान आणि श्रेष्ठ सुख मोकळे पणाने भोगता येते.
Article by : Hema Bhendarkar.
1 Comment. Leave new
nice article….