manushya-janmache-sarthak for marathi articles…
विषय वासना निमाली आणि अहंकार गेला. कि मग हे शरीर चिंतामणी प्रेमाने परमार्थ साधनेत ईच्छिल ते साहाय्य करील. ज्याचे चित्त विकार रहित झाले तो स्वत:च तीर्थाप्रमाणे पवित्र होतो. * मनुष्य जन्म दुर्लभ आहे, भाग्याने तो प्राप्त झाला तरत्याच सार्थक करायला पाहिजे. त्यासाठी संसारातच गुरफटून न राहता, विषय सुखातच गुंतून न पडता परमेश्वराच स्मरण ठेवण, त्यच्या नावच चिंतन करणं आवश्यक आहे, पण त्यासाठी देखील विषय त्याग अगोदर करायला पाहिजे, शरीर हेच धर्माचरणाचे श्रेष्ठ साधन आहे. म्हणून ते स्वच्छ, शुद्ध व समक्ष ठेवलं पाहिजे. शरीर कसे आहे त्याचा उपयोग कसा करावा, हे तुकोबांनी उत्तम रीतीने व विरोधाभासात्मक पद्धतीने समजाविले आहे. शरीर दु:खाचे कोठार | शरीर रोगांचे भांडार || शरीर दुर्गंधीचा थार | नाही अपवित्र शरीरा ऐसे || — हि शरीराची एक बाजू झाली, आता दुसरी बाजू, पहा… शरीर उत्तम चांगले | शरीर सुखाचे घोसुले || शरीरे साध्य हो केले | शरीरे साधले परब्रह्म || शरीर आलटून पालटून मोठ्या मार्मिकतेने तुकोबा शरीराचे गुण व अवगुण वर्णितात, उदा. ”शरीर माया मोहपाश जाळे”, ते काळाने व्यापले आहे ” त्याच्यामुळे पतन होते, पण शरीर शुद्ध आहे. त्याच्या योगे भवबंध तुटतो. देव शरीरात राहून भोग धेतो. ई. असे आणखी वर्णन करून शेवटी ते म्हणतात.
शरीर सुख नेदावा भोग | न द्यावे दु:ख नकरी त्याग || नव्हे वोखटे ना चांग | तुका म्हणे वेग करी हरी भजनी || — अर्थ– शरीर चांगले म्हणून त्याचे लाड करू नये, वाईट म्हणून त्याला दु:ख देऊ नये. ते एक साधन आहे. त्याचा जसा उपयोग करावा तसे फळ पाप्त होते. म्हणून त्याला हरिभजनी लावण्यास त्वरा करावी. येथेही विवेकाला प्राधान्य आहे, याकरिता असे करायला पाहिजे ? असे कि ” मुख्य आधी विषय त्याग | विधी भाग पाळणे ” – विषय त्याग म्हणजे विषय वासनेचा त्याग हा मुख्य आहे, तो प्रथम करावा आणि विधीचे, शास्त्राज्ञेचे पालन करावे. अर्थात आपल्या वाट्याला जो धर्म आला असेल. जे कर्तव्य आले असेल त्याचं पालन करावे. याप्रमाणे शार्स्त्रविहित धर्म-कर्म करावे, आणि भोगही भोगावे “विधी ने सेवन | विषयत्यागातें समान” असे तुकोबांनी अन्यत्र म्हटले आहे. विषयवासनेचा त्याग केला म्हणजे मनाला सामाधान होते. प्रसंन्नता येते. हेच ईश्वराचे देणे आहे. देहा विषयी उदासीन वृत्ती असावी. त्याचे लाड पुरू नये.
तुकोबाराया.