राज्याच्या कारभाराचा गाडा जिथून हाकला जातो त्या मंत्रालयाच्या इमारतीला आज आगडोंबात भस्म व्हावं लागलंय. आज गुरुवारी दुपारी 2:45 च्या सुमारास मंत्रालयात भीषण आग लागली. या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर दोघांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. दोघांची ओळख मात्र पटू शकली नाही. चौथ्या मजल्यात नगरविकास खात्याच्या कार्यालयात पडलेली ठिणगी काही तासात 3 मजल्यासह मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांचे दालन जळून खाक झाली. सहावा मजल्याची आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न अजून सुरु आहे.
आगीचा घटनाक्रम
2.46 – मंत्रालय पाचवा माळ्यावर आग लागल्याचा कॉल
दुपारी-2.50 – अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या ( 3 फायर इंजिन, 2 वॉटर टँकर, 1 रुग्णवाहिका)
दुपारी-2.50 – एक नंबर कॉल घोषित
दुपारी-3 वाजता- दोन नंबर वर्दी घोषित
सांयकाळी 4.03 ब्रिगेड कॉल घोषित – सर्व
सांयकाळी 4.45 – विविध अग्निशमन दलाचे बंब मागवण्यात आलेत (एकूण 20 फायर इंजिन , रुग्णवाहिका -013)
दुपारी-3.15 आपात्कालिन व्यवस्थापन कक्षात सर्व वरीष्ठ अधिकारी उपस्थीत
Source : Online News Updates