मंत्रालय तीन महिन्यात पूर्वपरिस्थिती येणार

Like Like Love Haha Wow Sad Angry भीषण अग्नितांडवात कोळसा झालेलं राज्याचं मंत्रालय सोमवारपासून महाराष्ट्रवासींयाच्या कामासाठी रुजू होणार आहे. खुद्द...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

chief minister visit to mantralayभीषण अग्नितांडवात कोळसा झालेलं राज्याचं मंत्रालय सोमवारपासून महाराष्ट्रवासींयाच्या कामासाठी रुजू होणार आहे. खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कामाला सुरुवात करणार आहे. मंत्रालयातील जळाले तीनही मजले तीन महिन्यात पूर्वपरिस्थिती येतील असा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केला. तसेच आगीत नष्ट झालेल्या फाइल्स लवकरात लवकर नव्यानं तयार होणार आहे. आज एका उच्च समितीने मंत्रालयाची पाहणी केली. जळालेल्या तिन्ही मजल्यात प्लायवूडच्या जागी आता फायरप्रूफ शीट वापरल्या जातील. सोमवारपासून मुख्यमंत्री पहिल्या मजल्यावरुन कामकाज सुरु करणार आहे. तर उपमुख्यमंत्री दुसर्‍या मजल्यावरुन काम पाहणार आहेत. उर्वरित विभागांचं कामकाज जीटी हॉस्पिटल आणि एमटीएनएल कार्यालयातून चालणार असल्याचं सांगण्यात येतंय. वनमंत्री पतंगराव कदम यांनी आज मंत्रालयात कामकाजाला सुरुवात केली. तसेच मंत्रालयात थेट फाईल्स पाठवू नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. प्रत्येक  तहसील कार्यालयात विशेष कक्ष उभारण्यात येणार आहे असं जाहीर करण्यात आलंय.

Source:  Online News.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories