जिऑलॉजी या र्जनलमध्ये हे नवे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. मंगळावर थोडेफार पाणी असण्याची शक्यता आहे; पण या ग्रहावरून फार पूर्वी पाणी वाहून गेल्याचे पुरावे आहेत असा आधीचा अंदाज होता. आधीच्या अंदाजात या जलाशयांचा उल्लेख कसा काय केला गेला नाही, असा प्रश्न वॉशिंग्टनमधील कार्नेजी संस्थेतील सहसंशोधक एरिक हॉरी यांनी विचारला आहे. मंगळावरील ज्वालामुखीमुळे हे पाणी तयार झाले असावे असा अंदाज आहे. हा अंदाज मांडण्यासाठी शास्त्रज्ञांनी मंगळावरून पृथ्वीवर कोसळलेल्या दोन उल्कांचा शोध घेतला आहे. मंगळावरून हे लघुग्रह २५ लाख वर्षांंंपूर्वी कोसळल्याचा अंदाज आहे. या उल्कांवर सेकंडरी आयन मास स्पेक्ट्रोमेट्री या तंत्राचा वापर करण्यात आला, त्यातून निघालेल्या निष्कर्षानुसार या उल्काखंडाच्या स्तरातील ७0 ते ३00 टक्के पाण्याचे कण आढळले आहेत. याचाच अर्थ असा की, मंगळाची निर्मिती होत असताना पाण्याचे साठे धरून ठेवण्याची मंगळाची क्षमता होती.
Source: Online News Updates.