laksha-gathayche-aslyas for marathi articles.
तुम्हाला कुठलेही एक ”लक्ष” गाठायचे असल्यास काय करायला हवे ? उदा:- एक प्रचलित अशी दंत कथा आहे की, स्वाती नक्षत्राच्या वेळीजर पाउस पडला आणि त्याचा थेंब जर शिंपल्यात पडला तर त्या थेंबाचा मोती होतो. मोतशिंपल्यांना हे ठाऊक असते, आणि म्हणूच ज्यावेळी स्वाती नक्षत्र उगवते त्यावेळी, ती शिंपले वर येऊन त्या मौल्यवान थेंबाची वाट पाहत आ वासून पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत राहतात, स्वाती नक्षत्राच्या पाण्याचा एक थेंब आत पडताच मोत शिंपले झटकन आपले कवच मिटते, आणि थेट कसलीही पर्वा न करता समुद्र तळाशी दडी मारून तिथे सावकाश त्या थेंबाचा मोती करण्यात एकाग्र चित्ताने गुंतून जातो. तेव्हा आपणही त्या मोतशिंपल्या सारखेच झाले पाहिजे. तेव्हा तुम्हाला काय करायचे आहे हे लक्ष {ध्येय} ठेऊन ते कार्य अगदी बाह्य जगतावरील दृष्टी काढून घेऊन बाह्य गोष्टींचे आकर्षण झिडकारून स्वत:च्या अंतर्यामस्थ सत्यात विकास करण्यास गढून जा.आपले जे कार्य आहे ते तडीस जाई पर्यंत त्यालाच चिकटून राहा, सतत तीच कल्पना तोच अभ्यास, त्याच कामाचे गुलांम व्हा, तीच स्वप्ने बघा, तेव्हा तुमचा मेंदू, तुमचे स्नायू, तुमचे मज्जातंतू, तुमच्या शरीराचा अणुरेणु, त्याच कल्पनेने भरून जाईल, ईतर कोणत्याही कल्पनेला थारा देऊ नका, यालाच यशस्वी होण्याचा मार्ग म्हटल्या जातो, शेवटी तूमच्या अंतरात्म्याला यश प्राप्त करून द्यावेच लागेल. ज्यांना उच्चतम शिखर गाठायचे आहे त्यांनी दुसर्या कुठल्याही चांगल्या किंवा वाईट प्रसंगाना पर्वा न करता आपल्या कार्या वरचे लक्ष हटू देऊ नका, खूप धृढपणे आपल्या लक्षास सामोरे जा, यश मिळण्यासाठी, सिद्ध होण्यासाठी कमालीची चिकाटी हवी, प्रचंड ईच्छा शक्ती हवी, खूप मनोबल हवे, प्रबल ईच्छा शक्तीने कुठलेही कार्य मागे राहत नाही. तेथे यश अवश्य आहेच. त्यासाठीच शिंपल्यांनचे उदा, दिले गेले आहे.मोत शिंपले मोती तर बनवितात पण त्या मोत्या सोबत शिंपल्याच्या आतील बाजुंना सुद्धा मोत्याचा चमकदार रंग चढतो. थोर थोर धर्मवीर, क्रांतिवीर, महात्मे, श्रेष्ठ व्यक्ती, मोठमोठे उद्योगपती,शास्त्रज्ञ ह्याच तर्हेने निर्माण होतात, त्यांच्या त्या महान कार्याने ते तेजपुंज बनतात.