एकाग्रता अशी वाढवा!
Like
Like Love Haha Wow Sad Angry

how-to-increase-concentration.How to Increase Concentration While Studying. Studying is difficult for some people because they have trouble focusing on one task for a long period of time.

Concentration images

मनातील शक्तीला दुसर्या गोष्टी वरून हलवून एका वस्तूवर किंवा विषयावर लावून घेणे, म्हणजेच एकाग्रता होय. जर एक बुद्धिवान व्यक्ती मनाला भरकटन्या पासून वाचवू शकत नाही अथवा शीघ्रतेने कार्य करण्याची सवय लावत नाही.तर ती व्यक्ती सुद्धा विश्वामध्ये अधिक कार्य करू शकत नाही. एकाग्रता बुद्धीला चालना देते. तिला प्रखर बनविते.जन्मजात प्रतिभा भलेही कमी असेल परंतु एकाग्रताही प्रतिभे मध्ये आश्चर्यजनक वृद्धी करू शकते. मनाची एकाग्रता योग्यतेचा प्राण आहे.अपूर्व सिद्धी देणारी आहे. खूप सार्या गोष्टींवर विखुरलेली मनाची शक्ती कदाचित काही करू शकेल परंतु एकाग्र मन एकत्रित सुर्यकीरणांनसारखे असंभवाला संभव करू शकते कोणत्याहि कार्या मध्ये कुशलतेचा आधार एकाग्रता आहे. स्मरणशक्तीसाठी एकाग्रता अनिवार्य आहे.
एकाग्रतेसाठी सूचना:- छंद अथवा आवड यांचा एकाग्रतेशी सरळ सरळ संबंध आहे.कोणत्याही कार्य अथवा विषया कडे एकाग्र होण्या साठी त्या विषयाची आवड, ईच्छा शक्ती निर्माण करणे आवश्यक आहे.त्यासाठी गंभिर प्रयत्न करावे लागतील.कोणत्याही कार्यास संपूर्ण रीतीने करण्याचे एक महान ध्येय आपल्या जीवना पुढे ठेवा.
आपल्या आवडींना अन्य गोष्टींपासून वगळून उपयुक्त गोष्टी शिकण्यामध्ये लावा. रुचीसाठीवस्तू अथवा विषयाच्या महत्वाला खोलवर समजून घ्या.आरंभी आवड नसली तरी सुद्धा तनामनाच्या शक्तीला त्या विषय वस्तूंवर लावून टाका. थोड्या अवधी मध्ये आपण आवड घेऊ लागाल.
* एकाग्रते साठी आवश्यक आहे कि एकावेळी एकच कार्य करून मनाला केंद्रित केले जावे. अन्य बाधांना युक्तीपुर्वक दूर करणे.
* मनास एकाग्रतेची सवय होण्या साठी दररोज आपणास प्रिय व उपयोगी असलेल्या पुस्तकांचे वाचन करण्याचा सराव करा. वाचनाने मन ईच्छे नुसार एकाग्र होऊ शकेल. स्मरण शक्तीचा  विकास होईल.
*  एकाग्रतेसाठी रात्री झोपण्या पूर्वी अथवा फावल्या वेळी दिवस भरयाच्या व सप्ताहाच्या सर्व बोधप्रद व महत्वपूर्ण गोष्टींची आठवण करा.
* केव्हाही आणि कोठेही ध्यान देण्याची आवशकता असेल तेथे एकाग्र चित्ताने ध्यान द्या.

Source of Article : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d bloggers like this: