बाजारात वाढलेली मागणी आणि गुंतवणूकदारांनी केलेली दमदार खरेदी यामुळे सोन्याच्या किमतीने आज प्रति दहा ग्रॅम ३0,७५0 रुपयांचा नवा ऐतिहासिक उच्चांक गाठला. यंदाच्या वर्षी मे महिन्यामध्ये लग्नाचे मुहूर्त नव्हते. जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये १२ मुहूर्त आहेत. त्या पार्श्वभूमीवर खरेदीचा जोर वाढल्यामुळे सोन्याच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. आज या किमतीमध्ये दिवसभराच्या व्यवहारात ३२५ रुपयांची वाढ होत नवा उच्चांक गाठला आहे. चारच दिवसांपूर्वी (१५ जून) सोन्याच्या किमतीने एका दिवसांत ४00 रुपयांची वाढ नोंदवित प्रति तोळा ३0,५७0 रुपयांचा नवा उच्चांक प्रस्थापित केला होता. एकीकडे सोन्याच्या किमती वाढल्या असतानाच, चांदीच्या किमतीतही मोठी वाढ झाली. दिवसभरात चांदीच्या किमतीमध्ये ८00 रुपयांची वाढ होत एक किलो चांदीचा भाव ५५,८00 रुपये इतका होता.