family-and-relationships. Learn how to improve relationships with family and friends. Hear stories from other Veterans.
नाते आणि त्यांची शुद्धता…….. समजून घ्या!
हा एक महत्वाचाच मुद्दा आहे. पूर्वी नाते म्हटले कि तो एक प्रकारचा नात्यांचा गुंताच असायचा. कुणाशीही कुणाचे कोणतेही नाते असो त्यात एक प्रकारची प्रेम भावना, गोडवा असायचा पण
हल्ली दिवसेन दिवस हा नात्यां मधला गोडवा कमीच होत आहे. वेळे अभावी, वाढत्या महागाईने म्हणा किंवा मुळातच प्रेम कमी कमी होत जात आहे काय? याला कारणेबरीच असू शकतात. पण तरी देखील काही नाते अशी संवेदनशील असतात. कि ती अतिशय जपायला हवी.
आपण आपल्या घराची नेहमीच साफसफाई करीत असतो. त्या मागे हि काही उद्देश असतात.आपल्या कडे येणारी व्यक्ती, पाहुणे त्यांना प्रसंन्न वाटावं म्हणूनही, वस्तूंची सफाई करतो कि त्या मौल्यवान वस्तू खराब होऊ नयेत, असेच काही चांगले उद्देश ठेऊन हे सर्व करीत असतो, तसच नात्याचं देखील आहे. आपले कुटुंबात परिवारात एकमेकांशी नाते चांगले असले तरच आपल्याला मान, प्रेम, ईज्जत मिळते. आपल्या बद्दल ईतरांच्या भावना फार चांगल्या असतात, तेव्हा नाते जपणेही अति मोलाचेच आहे. त्यातील एक मोलाचे नाते म्हणजे पती-पत्नीचे !
आजच्या या काळात पैशे मिळविण्याच्या कामात मनुष्य म्हणा किवा स्री एकदम बिझी झालेले आहेत, पण असे म्हणून चालणार नाही, त्यामागे आपले नुकसानही बरयाच प्रकारे होतात
हे सुद्धा आपल्या कधी लक्षात येत नाही.
*नाते कुठले हि असो ते जपावेच लागते फुलवावेच लागते, लग्न म्हणजे उच्चारा ईतक सोप नाही. परमेश्वराने प्रत्येकाला दिलेले रहस्यमय वरदान आहे, पण मानवाने आता त्याला नौटंकीचे स्वरूप आणले आहे, त्या मागच महत्व आता तिळमात्र उरलेलं नाही.पती पत्नी या नात्याला फक्त नाते एवढच गृहीत नं धरता त्या मागचा अर्थपूर्ण उद्देश लक्षात घेऊन ते ह्ळूवारच जपायला हवे. आयुष्य भराचा हा संसाराचा गाडा पिढ्यान पिढ्या सुरळीत चालवायचा असेल तर त्या कडे दुर्लक्ष न करता अगदी सुरवात पासून त्याला मृदू भाषेत, कडक शिस्तीत, शांत स्वरुपात अगदी सौम्यपणाने जपावे लागेल. नात्यानं मध्ये शुद्धता हवी, पत्नीने सर्व प्रथम स्वत:च्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यायला हवे. ती सुधृढ असेल तेव्हाच सर्वानची काळजी पूर्वक
सेवा करून स्वत:च्या जोडीदारालाही खुश ठेऊ शकेल, तसेच आताच्या घडीला मुलांना सुद्धा आई आकर्षक { एक्तीव्ह} हवी असते. तिने स्वत: नेहमी हसमुख राहायला हवे.मुलांनी किंवा पतीने, सुद्धा तिच्या प्रकृतीची काळजी घेण्यास हवी. म्हणजे नात्यातील गोडवा कायम राहील.
* कुटुंबात आवाजाची देवाण घेवाण अतिशय रुक्ष नसून तोला मोलाची असावी, वेळे परत्वी आवाज वाढविण्याचे असल्यास प्रथम शेजारी आजूबाजूला नसल्याचे भान असू द्यावे, घरातील समस्या घरातच सोडविण्याची कोशिश करावी, शक्यतो सौम्य आवाजातच संवाद साघावा. कधी कधी रुक्ष आवाजाने समस्या अधिकच बिघडतात.कुटुंबात सर्वाना मृदू आवाजाचीच सवय करावी. कधी तर आपल्या वागण्या तूनही समजाविल्या जावू शकते आवाजाची गरजही नसते.
* कुटुंबात एकमेकांच्या आवडी निवडी तसेच सवयी या सर्व आपल्याला झेपेल ईतपत जपायलाच हव्या, आपल्या आटोक्या बाहेरील असल्यास सुरवाती पासूनच त्यांना समजदारीने
व हळूवार समजावून सांगाव्यात. कुठल्याहि समस्या असल्यास घरातील प्रत्येकास त्या परिस्थितीची जाणीव करून द्यावी.काही महत्वाच्या समस्या थोडे फार प्रयत्न करून सुटत असतील तर अवश प्रयत्न करावा. त्यामुळे घरात प्रत्येकांत खुशीचे वातावरण राहील.
*दुसर्या बाजूने किंवा बाहेरील व्यक्तीं कडून तुमच्या नात्यात काही दुरावा तयार होत असल्यास त्या कडे दुर्लक्ष न करता सावध गिरीने लवकरात लवकर तो दुरावा कमी करण्याचा प्रयत्न करा. ज्यांच्या पासून नात्यांना किवा घराला पोखर लागत असल्यास तेथील संबंध कमी करा. असे मुलांच्याही बाबत होऊ शकते, तेव्हा तुरंत सावध व्हा, मुलांच्याही मित्र मैत्रिनि कडे लक्ष असू द्या. प्रत्येक समस्या खंभीर पणे दूर करा. वेळ घालवू नका. * रोजच्या कट कटीतून कंटाला आल्यास फ्रेश व्हा. आणि कुठेतरी फिरून या. प्रथम घरातील व्यक्तीं मध्ये कार्यक्रम ठरवा. घरच्यांच्या संमतीनेच आपल्या मित्र मैत्रिनिना कार्यक्रमात सहभागी करा. सोबत असल्यास वेळही चांगला जातो.
*घरातील तडजोडीत बरयाच वेळा आर्थिक, मानसिक, किंवा शारीरिक समस्या तैयार होतात. त्यात घरातील वातावरण बिघडू न देता लगेच सावध व्हा.
* बरयाच वेळा स्रियांना आपल्या माहेरपणाचा बडेजाव सांगण्यात फार कौतुक वाटते. हे सर्वच पुरुषयांना सहन होत नाही. [ हा अपवाद आहे! फारतर पुरुषयांना यात अभिमान वाटतो. ते एकूण घेतात.] तेव्हा त्यांच्या समोर हा माहेरचा बडेजाव टाळावा. यातही नात्यात दुरावा तयार होण्याची शक्यता असते. पतीच्या स्वभिमानातच अभिमान ठेवावा. कधीही जुन्या आठवणीत कुणाच्याही चुका काढीत बसू नका, वेळेला महत्व देऊन वर्तमानातच जगायला शिका.
* प्रत्येका मध्ये चांगल्या वाईट गोष्टी असतातच. ज्यांना ज्या काही गोष्टीन मध्ये आवड असल्यास त्यांना त्या करू द्या. त्यात त्याचं कौतुक करा. पतीला स्वयंपाकाची आवड असल्यास कधी कधी करू द्या. त्यात संकोच करू नका त्यानंतर त्याचं कौतुक करा.
* आजच्या या महागाईच्या काळाला अनुसरूनच आपल्या घरातील आवश्यक वस्तू घ्या. अनावश्यक वस्तूंचा मोह टाळा. बजेट मध्ये न बसणारा खर्च टाळून पतीच्या अर्थव्यवहारास मदत करा. त्या बाबत मुलांनाही समजावून सांगा कधी कधी रुपयांचा बजेट न लावता खर्च केल्याने संसाराच्या गाड्याचा समतोल बिघडून फार मोठ्या समस्या निर्माण होतात.त्यातही नात्यानं मध्ये दुरावा तयार होतो व मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे आपल्या लक्षात हि येत नाही. तेव्हा वेळे नुसार प्रत्येक कार्यासाठी समजदारी ठेवूनच खर्च करावा. यात सर्वांचा फायदा आहे.व कामे पार पडल्या जातील आणि संवेदनशील असे हे नाते टिकविल्या जातील. कुटुंबातील प्रत्येकाचे कार्य सफल होवून खुशहालीचे वातावरण राहील.
* कुटुंब व नाते म्हटले कि प्रत्येकाने एकमेकांस अगदी तत्परतेने मदतीला सामोरे गेलेच पाहिजे. तेव्हाच.पिढ्यान पिढ्या सुसंस्कृत संस्कार टिकून राहील,
* महत्वाच म्हणजे देवांनी दिलेल्या या रहस्यमय वरदानाचे स्वरूपही बदलण्यास मदत होईल.

Source : Mrunal Funde
Nagpur.
2 Comments. Leave new
super article ………..hatts off………… really like this article…….
Nice article……………………. good one….