लहानपणा पासूनच मुलांना भूक लागते.पण त्यांना लहान वया पासून जेवणाची व जेवणात काय खायचं ? या गोष्टीची कल्पना आईला असतेच ! पण त्याच्या भुकेच्या वेळेवर त्याला जेवायला द्यायचे म्हणजे कधी कधी आईलाही कटकट वाटते. तेव्हा त्यांना काहीतरी म्हणजे आता बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य उत्पादने भरपूर प्रमाणात आलेले आहेत, ते खाण्यात मुलांनाही ख़ुशी वाटते व आईही खुश असते पण त्यांच्या सवयी आपणच बिघडवीत आहोत या गोष्टीचे भानहि त्यांना नसते, ते सर्व खाल्या नंतर त्याला भूक कुठून असणार मग त्याना नको त्या वेळी आई त्यांच्या मागे जेवणाचे ताट घेऊन मागे लागणार तेव्हा मुल कुठून जेवणार. त्यांची भूक पहिलेच मिटलेली असते. अश्या वेळी जेवण नाही तर दुधात वेगवेगळ्या पावडरी वापरण्यात येतात. त्यांनी मुलाची भूक मिटते व भरपूर शक्ती मिळते. हा आगळा वेगळा समज असतो. मुलगा अभ्यासातहि पहिला येईल आणि खेळातही प्रवीण होईल. हा खोटा प्रचार असतो. तो अन्न खात नाही तर त्याच्या पोटात अन्नामधले तंतुमय पदार्थ कसे जाणार हा विचार मनाला कधी शिवत हि नाही. पण त्यांना जेवणाची शिस्त लावण्याची कटकट करण्यापेक्षा पैसे फेका आणि विकत आणा यातच मज्जा वाटते.त्यात त्यांचे आरोग्य व त्यांच्या सवयी बिघडेल काय हि कल्पना सुद्धा नसते.
Source : Marathi articles.