मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ही माहिती देताना सांगितले, या पाच वर्षांच्या कालावधीत ५,३७२.४१ कोटी रुपये बागा उभारणे, पुतळे लावणे यावर खर्च करण्यात आले होते. बहुजन समाज पक्षाने त्यांच्या सत्तेच्या गेल्या पाच वर्षांच्या काळात थोडेथोडके नव्हेत तर तब्बल ५000 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती उजेडात आली आहे. यापैकी ३७७ कोटी रुपये २00८ च्या तीन महिन्यात मंजूर केले गेले तर १४३५ कोटी रुपये २00८-0९ या कालावधीत मंजूर केले गेले होते. तसेच लोकनिर्माण विभाग व सिंचन विभागानेही बरीच मोठी रक्कम मंजूर केली होती. या रकमेतून भीमराव आंबेडकर सामाजिक प्रतिष्ठान स्थळ, कांशीराम स्मारक स्थळ, बुद्ध शांती क्रॉसिंग, स्मृती उपवन, रमाबाई आंबेडकर मैदान, तसेच अन्य काही ठिकाणी निर्मिती कार्य करण्यात आले होते.
Source : Online News