beauty-parlour-ek-samsya articles, beuty porlour is big problem in the socity, beuty pourlar ek samsya, blogspot, latest marathi news, marathi news, readers blog, top articles …
समस्या — पण काय?—- ब्यूटी पार्लर —
अनेक वर्ष यशस्वीरित्या ब्युटी पार्लर चालवीत असण्यारांची,
* थोडी उसंत मिळाल्या नंतरचे विचार म्हणजे “आजकालच्या बायांना ” वाटतं कि पार्लर मध्ये जावून खूप पैसे खर्च केले कि आपण लगेच सुंदर आणि आकर्षक दिसणार! ‘सिल्व्हर फेशियल, करा, ‘ गोल्डन फेशियल’ करा. असा आग्रह धरतात, पण एक दिवस त्वचेची काळजी घेतल्याने काय होणार. त्यांना नेहमीच टवटवीत दिसण्या साठी काही प्रयत्न करावयास सांगावे. कि उन्हात फिरण्याच्या आधी सनस्क्रीन लावावे, झोपताना चेहरा स्वच्छ धुवावा, हलका मसाज करावा, प्रत्येक आठ दिवसांनी चेहरयाला वाफ ध्यावी, चेहरा चिंता व तणाव यां पासून मुक्त राहावा, म्हणून आनंदी वृत्ती ठेवावी, रोज मोकळ्या हवेत फिरायला गेल्याने, त्वचेला तजेला येतो, कच्ची कडधान्ये मोड आणून खावी, पालेभाज्या व स्यालेड खावे, पण ईतका सल्ला देवूनही या बायका स्वत:वर कोणतेही बंधन किंवा नियम घालून घेण्यास तयार नसतात.एक दिवसात यांची “सुंदरी” करायला काय जादू आहे काय? हे तर विचार करण्या सारखेच आहे! त्यांनी प्रथम विचार करावा, मुलायम त्वचा, रेखीव चेहरा, मोहक रूप यातले देवा घरून आपण काय आणले आहे? तेच नसेल तर ईतर प्रयत्नांना मर्यादित प्रमाणात व मर्यादित वेळे पुरताच यश येणार.
* सुंदरता हि ईश्वरीय देणगीच आहे हे लक्षात घ्यावे.