be-cool-be-positive.Be Smart, Be Cool, Be Positive. What is Be Smart, Be Cool, Be Positive? Be Smart, Be Cool, Be Positive is designed to be a fun and interesting way to help …
सकारात्मक व्हा.
सकारात्मकतेची सर्वात चांगली भावना म्हणजे प्रेम आहे! प्रेम भावने मुळे उच्चतम पातळी गाठता येते. कारण जेथे प्रेम उतपन्न होते तेथे कोणतेही विकार किंवा विकृतीचे आस्तित्व असू शकत नाही. प्रेम म्हणजे पावित्र्य, निर्मलपणा आणि संपूर्ण सकारात्मकता. प्रेम हि भावना ज्या वेळेस उत्पन्न होते त्या वेळेला ती एकटी नसते. तर माया, ममता, त्याग, बलिदान आणि दुसरयासाठी सर्वस्व अर्पण करण्याची मानसिकता ईत्यादि अनेक चांगल्या गुणांचा समुच्चय तिच्या सोबत असतो. अनेक मोठमोठ्या संतांनी, थोरामोठ्यानी उगाच प्रेमाची महती सांगितलेली नाही. प्रेम आपलेपणा निर्माण तर करते; पण अनेक नकारात्मक भावनांना संपून टाकते, तेव्हा सकारात्मक होतांना प्रथम प्रेम भावनेची निर्मिती करा. ती वृद्धिंगत होईल असे पहा!दुसर्याला भरपूर प्रेम द्या. तुंम्हालाही सुखसमाधानाचा परतावा मिळेल.
सकारात्मकते चा आनंद
लक्षात घ्या — मनाचा प्रत्येक कोपरा प्रेमाने भरा!
प्रेम भावना तुमच्या कडे जेव्हा येत असतात तेव्हा जर तुम्हाला स्वत:विषयी वाईट वाटत असेल तुम्ही दु:खात गुरफटला असाल तेव्हा तुम्ही तुमच्या कडे येणाऱ्या प्रेमाला अडवत असता. अस्य बाव्नावेगात तुम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्ती आणि दु;खी घटनाच आठवतात. ज्यामुळे परिस्थितीत बदल न होता युम्हला स्वत:बद्ल वाईटच वाटत राहील. तेव्हा तुम्ही स्वत:कडे लक्ष देणे अतिशय गरजेचे आहे. नेहमी प्रमाणे लक्ष सकारात्मक गोष्टी कडे रमवायचं आणि मनाचा, विचारांचा कोपरा न कोपरा प्रेमानी भरून टाकायचा. सर्व मन आनंदाने निश्चित भरून जाईल.
‘वचनामृत’
दुसर्या पेक्षा आपल्याला अधिक काही येते, या गर्वाने कोणाला हिणवू नका.कुणाला हि तूछ माणू नका.दुसर्यालाही आपल्या जवळचे द्यावे. व आपल्या सारखे करावे. आपल्या लहरींचे गुलाम म्हणजे काही स्वातंत्र्य नाही. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे.स्वातंत्र्य म्हणजे विकास आणि स्वत:ची जबाबदारी.
साने गुरुजी.