बालवयातील शिक्षण, अभ्यास..




Like
Like Love Haha Wow Sad Angry

balpanatil-shikshan-ani-abhyas for marathi articles

                                          ” बालवयातील शिक्षण, अभ्यास आणि — तेच पुढचे ध्येय”

मनुष्य त्याच्या जन्मापासून शिकत असतो. हि शिकण्याची क्रिया त्याच्या अंतापर्यंत अविरत चालू असते. लहानपणी आई वेगवेगळ्या गोष्टीतून शिकवत असते, त्यातून मुल नित्यनवे अनुभव घेत असतो. लहानपणी त्याला शिकविण्यासाठी सारेच उत्सुक असतात. त्याच्या अनेक गोष्टीचे कौतुकही होते. वारंवार शिकवून किंवा सांगून त्यांना प्रत्येक गोष्टीचा सराव होतो, तोच सराव म्हणजे अभ्यास होय,.अभ्यास आणि मानवी जीवन व्यवहाराचा अत्यंत जवळचा संबंध आहे. बाल वयात असतांना बालकांची ‘आई’ आणि त्याच्या भोवतालच्या परिसरातील त्याच्या बद्ल जिव्हाळा असलेले लोक त्याला विविध प्रसंगी मार्गदर्शन करीत असतात. बालकाच्या जीवनातील प्रगतीच्या वाटा सर्वांच्या मार्गदर्शनातून विकसित होत जातात.आणि जसजसे वय वाढत जाते, तसतसे बालकाचे पूर्ण विकसित व्यक्तिमत्व मनुष्याच्या रूपाने आकाराला येते.

त्यानंतर विद्यार्थी जीवनात त्याचा शारीरिक, बौद्धिक, मानसिक, नैतिक असा सर्वांगिक विकास होणे आवश्यक आहे. आज विद्यार्थ्याला शिकविण्यान साठी भव्य आणि प्रशस्त आधुनिक सुखसोयींनी युक्त अश्या शाळा, प्रत्येक विषय शिकवायला त्या त्या विषयात पारंगत असे शिक्षक, आकर्षक पाठ्य पुस्तके, दप्तराचे ओझे कमी व्हावे म्हणून शासन प्रयत्नशील आहेतच, तरीही अभ्यासाचे महत्व पटायला, शिक्षका कडून अभ्यास समजायला, अभ्यास कसा करावा हे सर्व कळायला काही विध्यार्थ्यांना त्रास जातो. अश्यावेळी अभ्यास कष्टदायक व तिरस्करणीय वाटतो. पण असे वाटायला नको, अश्यावेळी अभ्यास हसत खेळत आनंददायक वाटावा त्या पद्धतीने शिकविण्यात यावा. अभ्यास हा आपल्या जीवनाला विधायक वळण लावणारा महत्वाचा तीन अक्षरी महामंत्र आहे. अभ्यासाबद्दलची भीती, दडपन, नावड काढून टाकणे आवशक आहे. तेव्हाच कुठलाही विषय असो आनंदाने शिकता आला पाहिजे, एकदा अभ्यास मनाला पटला कि तो सोपा वाटतो, व मनापासून शिकण्याची आवड निर्माण होते. अभ्यास करण्या विषयी मनाचाच ठाम निर्धार पाहिजे.

अभ्यास हि साधना आहे जगाच्या पाठीवर असे कितीतरी लोक आहेत कि ज्यानी अशक्य गोष्टी शक्य करून दाखविल्या आहेत. अभ्यास करणे हि गोष्ट फार कठीन नाही. सतत अभ्यास आणि सराव हेच महत्वाचे आहे. आपली समस्या काय आहे याचा शोध घ्यावा, आई-वडिलांचे व वडीलधार्या माणसांचे मार्गदर्शन घ्यावे, वाचन वर जास्त भर द्यावा वाचन करताना मन एकाग्र ठेवावे.वाचलेल्या भागावर मनन करणे अति आवशक असते, तरच त्या दीर्घ काळ लक्षात राहतील, कधी कधी शिक्षक एखाद्या विध्यार्थ्याला अप्रत्यक्षपणे पणे कोणता विषय जमत नसेल तर पूर्व सूचना देतात. त्याकडे विशेष लक्ष देवून त्या विषयाला घाबरून न जाता. त्याच विषयाचा चांगला सराव करावा, शिक्षकांनीही त्या विषयाची भीती विध्यार्थ्यामध्ये घालू नये. त्याउलट गोडी निर्माण करावी. याकडे आई वडिलांनी विशेष लक्ष ध्यावे. कधी कधी शिक्षकाला या बद्दल अध्यापनाचे तंत्रच अवगत नसते, तेव्हा आपल्याच मुलाचे नुकसान होते या गोष्टी लक्षात घ्यावयास हव्या.मुलांच्या प्रत्येक विषयात चौकसपणा असावा.अभ्यासा बाबत चिकित्सकवृत्ती असावी. मुलां मध्ये शिकलेल्या विषयाचे सखोल चिंतन करण्याची त्यांची मनाची तयारी असावी याकडे लक्ष ठेवावे.

मुलांच्या मनात आपले आई-वडील आपल्या शिक्षणासाठी खर्च करतात, वेळ काढतात, आपल्याला हवे नको ते बघतात,हे सर्व गांभीर्य ठेवूनच अधिक ज्ञान मिळविण्यासाठी प्रयत्न शील असायला पाहिजे, या सर्व गोष्टी त्यांच्यात सुरवाती पासूनच रुळायला पाहिजे असे सुसंस्कार टाकण्याचे प्रयत्न कराल तर ते मुल स्वत:चे ध्येय व लक्ष गाठू शकतील. आपल्या मुलाच्या आवडी निवडी लक्षात घेऊन { अभ्यासा बाबत असो व कुठल्याही } त्या कडे विशेष लक्ष ध्यावे त्याला जो अभ्यास जमत नसेल त्यावरप्रेशर टाकू नये. ज्ञानामुळे विद्यार्थी दशे पासून विद्यार्थ्याची मनुष्यत्वा कडे वाटचाल सुरु होते.ज्ञान हे व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी साधन आहे. ज्ञानामुळे विद्यार्थ्याची बौद्धिक, मानसिक, भावनिक प्रगती होते.अभ्यासामुळे ज्ञान कौशल्य त्याला जगापुढे मांडता येते. आत्मविश्वास, मनोबल वाढतो, व्यक्तिमत्वाचा विकास पूर्ण होते. वैज्ञानिक दृष्टीकोन येतो, अंधश्रद्धा नाहीशी होते व दैववाद सोडून प्रयत्नवादी बनतो, आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तरजीवनातील सर्वच परीक्षांना उपयुक्त अशा ज्ञानाच्या कक्षांना स्पर्श करणारा अभ्यास प्रत्येकाने करावा लगतो. स्पर्धेत अग्रेसर राहावे लागते. धाडसाने तरबेज होतो. असा उच्च महत्वाकांक्षी विद्यार्थी अग्रस्थानी असतो. हा विद्यार्थी स्वत:च्या कुटुंबाची, राष्ट्राची प्राणधारणा ठरते. तोच आपले ध्येय साध्य करू शकतो. मग कोणत्या आई-वडिलांना वाटणार नाही कि माझा मुलगा असाच ध्येयवादी असावा? तेव्हा आपल्या मुलाला ध्येयवादी बनवायचे असेल तर अगदी मुलांच्या लहान वयापासूनच सतर्कता बाळगून कसोशीने त्याच्या वर सुसंस्कार टाकण्यास प्रयत्नशील राहा.

Source : Marathi Unlimited articles section.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu