apali-awad-apalech-vichar for matathi articles….
” आपली आवड आपलेच विचार ”
आपल्याला जे पाहिजे असते त्यावर आपण आपल लक्ष केंद्रित करतो, तेव्हा त्या गोष्टी आपल्याकडे आकर्षिल्या जातात. नियती त्या गोष्टी आपल्याला देत असते. विचार आणि कल्पना या दोघांची भूमिका सारखीच असते. जितका विश्वास जास्त तितका परिणाम अधिक कारण नियतीला सर्व सारखच असतं !
* विचारा बद्धल नेहमी जागरूक राहा आपल्या विचारांची काळजी घ्या. विचार पवित्र व हितकारक असू द्या. कारण विचारांनीच उच्चार घडू शकतात.
* आपल्या बोलण्याची काळजी घ्या, बोलणे फुलाहून मृदू व रत्नांहुन मौल्यवान असू द्या.कारण व्यक्तव्यातुंनच कृती घडते.
* आपल्या कृतींची काळजी घ्या. कर्म हे सर्वांना सुखदायी व्हावे, कारण आपल्या कृतीतुनच सवयी बनतात.
* आपल्या सवयींची काळजी घ्या. संस्कार बदलले तरच जगात बदल करता येईल, कारण सवईतुनच चरित्र बनते,
*आपल्या चारित्र्याची काळजी घ्या. उत्तम चारित्र्य हे श्रेष्ठ भाग्याचे आधार आहेत. कारण चारित्र्याने भाग्य बनत असते.
पं. श्रीराम शर्मा आचर्य —