संयुक्त आंदोलनात मतभेद!

Like Like Love Haha Wow Sad Angry रष्टाचार व काळ्या पैशाच्या मुद्यावर समाजसेवक अण्णा व रामदेवबाबा यांच्या आज येथील संयुक्त...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

india against curruptionरष्टाचार व काळ्या पैशाच्या मुद्यावर समाजसेवक अण्णा व रामदेवबाबा यांच्या आज येथील संयुक्त आंदोलनात मतभेदांचा एक अंक चांगलाच गाजला. केजरीवाल व रामदेवबाबा यांच्यातील मतभेदाला आज आंदोलनाच्या व्यासपीठावरच तोंड फुटले. केजरीवाल यांनी मंचावरून नाट्यमय एक्झिट घेतल्यानंतर पडद्यामागचे नाट्य आणखी रंगत गेले.

समारोपाला केजरीवाल यांच्या भाषणाने आंदोलनाला वेगळेच वळण मिळाले. त्यांची भाषणात पंतप्रधान मनमोहनसिंग व अन्य मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. सरकार मुलायमसिंग, लालूप्रसाद यादव, मायावती, जयललिता अशा काही नेत्यांविरुद्ध सीबीआयचा वापर करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला. या आरोपानंतर केजरीवाल भाषण संपवून आपल्या जागेवर येऊन बसले आणि लागलीच रामदेवबाबांनी माईक हातात घेतला. आज व्यासपीठावर कुणाचेही नाव घ्यायचे नव्हते. पण अरविंदजींनी ते घेतले. आमचे आंदोलन कोणाही व्यक्तिविरोधात नाही, असे रामदेवबाबांनी माईकवरून स्पष्ट केले.

News Source : Online

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories