adhyatma-atmakalesh, adhatma ki khoj, adyatma ki khoj by acharya winoba bhawe, atma kalesh by acharya winoba bhawe, pandi shriram sharma …
अध्यात्म… जीवनाची सार्थकता.
माणूस आपल्याला शरीर समजतो. तो आत्म्याच्या सुखाची कदर करत नाही. व शरीर सुखासाठी भौतिक संपत्ती व भोग सामग्री जमविण्यात आपले संपूर्ण जीवन घालवतो. अश्या माणसाचे जीवन हे. पशूप्रमाणे पापरूपी व निकृष्ट प्रकारचे होते.
शरीर भावनेतून जागृत असलेला मनुष्य जर आपल्या आहार, निद्रा, भय, मैथून अश्या अत्यंत. सामान्य कार्यक्रमाप्रमाणे चालत राहिला तर त्याचे पशुवत जीवन सूद्धा निरर्थक आहे. त्यात सार्थकता मुळीच नाही. काम आणि लोभ अशी तत्वे आहेत कि, मानसाला ती कितीही अधिक मिळाली तरी त्यात तो समाधानी होऊ शकणार नाही. जेवढे मिळत राहते तेवढी त्याची तृष्णा व त्याच बरोबर अशांती, चिंता, कामना तसेच व्याकुळता दिवसें दिवस वाढत जाते. या भोगात जेवढे ही त्याला सुख मिळते. त्याच्या कितीतरी पटीने दु:ख उत्पन्न होत राहते. असा दृष्टीकोन असणारी माणसे स्वत:हि सुखी होत नाही व ईतराला सुखी होऊ देत नाही.
जीवनाची खरी समृद्धी व यश आत्मजागृतीत आहे, जेव्हा मनुष्य मी आत्मा आहे असे समजतो त्याची ईच्छा, आकांक्षा आणि रुची अथवा आवड त्याच कामाकडे वळून जाते, त्यातच खरे आध्यात्मिक सुख प्राप्त होते, आम्ही दैनंदिन जीवनात पाहतो कि, चोरी, हिंसा, व्यभिचार, छळ आणि अनीती अशी दुष्कर्मे करताना अंत:करणात एक प्रकारे कळ माजतो, व पाप कर्मे करताना पाय थरथरायला लागतात. याचा अर्थ असा आहे कि त्याच्या या कामाला त्याचा आत्मा न पसंती दर्शवितो, हे त्याच्या आवडीच्या व स्वार्थाच्या विरुद्ध आहे. विपरीत आहे, मनुष्य जेव्हा परमार्थ परोपकार, सेवा, मदत, दान, औदार्य, त्याग, तपं, यां सारखे पुण्य कर्म करतो, अश्या वेळी त्याच्या हृदयातील आतील कोपर्यात मोठे सामाधान, हलकेपण आणि आनंद आणि उल्हास निर्माण होतो, याचाच अर्थ असा आहे कि पुण्य कर्म हे आत्म्याच्या स्वार्थाला अनुकूल आहे. तो असेच कार्य पसंत करतो. आत्म्याचा आवाज ऐकणारे व त्याच्याच आदेशाने चालणारे नेहमीच पुण्य कर्मी असतात, पापाच्या बाजूला त्यांची वृत्ती वळतच नाही. त्यांच्या कडूनच पुण्याची कामे होत असतात.
आत्म्याला खरे सुख हे माणसाने केलेल्या सत कर्मामध्येच मिळते. शरीराचा मृत्यू झाल्या नंतरही जीवाला सदगती मिळण्यासाठी सतकर्मे करणेच आवशक आहे. यासाठी आत्म्याचा स्वार्थ पुण्यातच आहे. शरीराचा स्वार्थ त्याच्या विपरीत आहे. .
आचार्य पं.श्रीराम शर्मा.
आत्म्याला खरे सुख हे माणसाने केलेल्या सत कर्मामध्येच मिळते. शरीराचा मृत्यू झाल्या नंतरही जीवाला सदगती मिळण्यासाठी सतकर्मे करणेच आवशक आहे. यासाठी आत्म्याचा स्वार्थ पुण्यातच आहे. शरीराचा स्वार्थ त्याच्या विपरीत आहे. .
आचार्य पं.श्रीराम शर्मा.
आत्मक्लेश
* एखादी गोष्ट शरीराला व मनाला सामान्यत : सुखकारक असूनही स्वत:च्या ईच्छे विरुद्ध होत असल्यास आत्म्याला क्लेश कारक वाटते. व दुसरी गोष्ट शरीराला किंवा मनाला सामान्यत: दुख्कारक वाटणारी असूनही स्वत:च्या ईच्छे नुसार होत असल्यास तिच्या मुळे आत्म्याला तृप्ती वाटते
* शरीराला आणि मनाला वेदना देणारी कोणतीही गोष्ट घडावी अशी मनुष्याला सामान्यत: ईच्छा नसते. आणि शरीराला व मनाला आराम किंवा सुख देणारी गोष्ट घडावी असे सामान्यत; मनुष्याला वाटते.म्हणून सामान्यत: शरीराला किंवा मनाला ज्यामुळे वेदना होतात. त्या गोष्टी आत्म क्लेश कारक असतात. आत्म्याला तृप्ती वाटणे किंवा क्लेश होणे हे कोणत्याही गोष्टीच्या स्वभाविक स्वरूपात किंवा गुणधर्मावर अवलंबून असते. एखादी गोष्ट शरीराला किंवा मनाला सामान्यत:सुखकारक असूनही स्वत:च्या ईच्छे विरुद्ध होत असल्यास आत्म्याला क्लेश कारक वाटते, व दुसरी गोष्ट शरीराला किंवा मनाला सामान्यत: दुख कारक वाटणारी असूनही स्वत:च्या ईच्छे नुसार होत असल्यास तिच्या मुळे आत्म्याला तृप्ती वाटते या वरून शारीरिक किंवा मानसिक सुख व आत्म्याची तृप्ती यांचा अभेद्य संबंध नाही हे दिसून येईल, आत्म्याला त्रूपी वाटणे किंवा क्लेश होणे हे सर्वस्वी स्वत:च्या ईच्छे नुसार घटना घडत आहेत. किंवा स्वत:च्या ईच्छे विरुद्ध घडत आहेत यावर अवलंबून असते.
आचार्य विनोबा भावे