अण्णा हजारे यांच्या चमूमध्ये फूट पाडण्यासाठी सुमारे १00 कोटी रुपये खर्च केल्याचा खळबळजनक आरोप टीम अण्णातील महत्त्वपूर्ण सदस्य अरविंद केजरीवाल यांनी केला.
आगामी भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला पाठिंबा मिळविण्यासाठी ते इंदूरमध्ये आले असता पत्रकारांशी बोलत होते. हा खर्च करणार्याचे नाव सांगण्यास नकार देताना केजरीवाल म्हणाले की, मला कुणाचेही नाव घ्यायचे नाही परंतु; हे सर्वकाही करण्यामागील व्यक्तीचे नाव तुम्हाला (पत्रकार) चांगल्याप्रकारे माहीत आहे. टीम अण्णातील सदस्यांमध्ये खिंडार पाडण्याचे सातत्याने प्रयत्न झाले. पण आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नसल्याने प्रयत्न करणार्यांचे फावले नाही.
शेवटच्या श्वासापर्यंत लढा देण्यासाठी आम्ही सर्व वचनबद्ध व एकजूट आहोत. आमच्याकडे लपवण्यासारखे काहीच नसून कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत.