what-is- Personality arises from within and makes us who we are. Learn more about how psychologists define personality, Personality has to do with individual differences among people in behaviour patterns, cognition and emotion…
आवशक असे व्यक्तीमत्वशिस्त: आयुष्यात शिस्तीला खूप महत्व आहे. स्वयंशिस्तीने वागल्यास सारे जग जिंकता येते. चालण्यात, बोलण्यात, व्यवहारात, कामे करण्यात शिस्त हवी. शिस्तीने वागल्यास आपल्याला श्रीमंती येते. इतरांची मने त्यामुळे जिंकता येतात. इतरान कडून कामे करून घेता येतात कडून कामे करून घेता येतात आपण थोर लोकांचा इतिहास पाहिल्यास त्यांनी त्यांच्या आयुष्यात शिस्तीला खूप महत्व दिले होते. असे दिसून येते.
संपर्क कला : माणसाला आयुष्यात अनेकांशी संवाद साधावा लागतो. संवाद हा बोलून, लिहून, चित्र काढून, हवाभावाने, नजरेने साघता येतो. विषयावर प्रभुत्व, भाषेवर प्रभुत्व, सभा धीटपणा, संवाद कौशल्य असेल तर सारे जग जिंकता येते. योग्य ठिकाणी योग्य संपर्क कलेचा वापर करावा. स्वताच्या मनातील गोष्ट इतरांच्या मनापर्यंत पोचविण्यासाठी प्रभावी संपर्क माघ्यमांचा उपयोग करावा. संपर्क कलेत पारंगत असलेल्या माणसाचे व्यक्तिमत्व खुलते, फुलते ते ईतरांना प्रिय होते.
श्रमाची लाज नको : श्रम करण्याची लाज वाटता कामा नये. श्रम हे देखणे हवेत, त्यात शिस्त हवी, योग्य वेळी योग्य श्रम हवेत. भगवान श्रीकृष्णांनी यज्ञाच्या वेळी पंक्ती जेवल्या नंतर पत्रावळी उचलल्या होत्या. आळसामुळे आयुष्यात सर्वात जास्त नुकसान होते. श्रमाची आवड असेल तर व्यक्तिमत्व अतिशय सुंदर होते. आकर्षक बनते.जनमानसात आदर मिळतो.
नेतृत्व गुण, टीम स्पिरीट : आपण नेहमी पुढे राहायला हवे. ईतरांना बरोबर घेवून जाण्याची सवय हवी. ईतरांची मने जाणून घेण्याची सवय हवी. सुसंवाद साधून कामे करण्याची सवय हवी. आपली मते ईतरांना समजावून सांगण्यात नम्रता हवी. पराभवाची जवाबदारी स्वत; स्वीकारता यावयास हवी. ईतरांना आदर देण्याची सवय हवी. ईतरांच्या सुख दु:खात सामील होण्याची सवय हवी. विजयाचे श्रेय ईतरांना देण्याची सवय हवी.
सर्जनशीलता : कोणतेही काम सर्जनशीलतेने, कल्पकतेने करायला हवी. प्रतेकाने स्वत:ला तशी सवयच लावून घ्यावयास हवी. सर्जनतेचा अवलंब केल्यास काम कमी श्रमात, कमी वेळेत
होते: काम कमी खर्चात आणि जास्त देखणे होते त्यासाठी कमी लोक लागतात, एकाच वेळेत अनेक कामे करता येतात कल्पकता ही निसर्गाने मानवाला दिलेली मोठी देणगी आहे. तिचा वापर प्रत्येकाने करावयास हवा.
योग्य मार्गावर चला, भटकू नका : चांगल्या उदेशाचे लक्ष गाठण्यासाठी आपला प्रवास नेटखने व अखंड चालत राहायला पाहिजे. थोडाफार थकवा आल्यास थोडी विश्रांती घ्यायला हरकत नाही. पण नेमलेल्या मार्गावरून मुळीच चलायला मात्र नको. मार्गात कितीतरी अडचणी येतात, अडथळे येतात, आपणाला ते भीती दाखवतात भटकउ पाहतात, कघी काही प्रलोभन देऊ पाहतात. जंगलात जनावरांचा कल्प वाटेल त्या मार्गाने भटकत राहतो. त्याच्या चालण्याने पायवाट तयार होते राजमार्ग सोडून या पायवाटेने जाणे सोपे जाईल, असे कुणाकुणाला वाटू लागते, कित्येक जन जवळचा सोपा रस्ता समजून त्या वाटेवरून जाऊ सुद्धा लागतात. पण त्याचा परिणाम उलट होतो. त्यांना अघिक त्रास होतो, थकवा येतो व मार्ग नीट न गवसल्यामुळे निराशा पदरी पडते. अपूर्णतेतून पूर्णते कडे निश्चीतठरलेल्या मार्गाने न थांबता सतत प्रवास करीत राहणे हेच उदीष्ठ प्राप्त करण्याचे खरे साधन आहे.
वेळेचे व्यवस्थापन : प्रत्येकाला आपल्या वेळेचे व्यवथापण करता यावयास हवे., वेळ हि सर्वात महत्वाची गोष्ट आहे. गेलेली वेळ परत येत नाही. वेळ साठवता येत नाही. एकाचा वेळ दुसरयाला देता येत नाही जगात कमी कमी होत जाणारी गोष्ट म्हणजे माणसाचे आयुष्य! वेळेचे अर्ज काढता येत नाही. अगोदर जास्त महत्वाची जास्त तातडीची कामे करावी. त्यानंतर कमी महत्वाची व जास्त तातडीची कामे करावी. त्यानंतर जास्त महत्वाची परंतु कमी तातडीची कामे करावी. म्हणजे कमी वेळात जास्त कामे करता येतात. वेळ बुद्धी कौशल्याने, योग्य व्यवथापणाने, योग्य साधनाने,योग्य ताकदीने, ईतरांचे सहकार्य घेतल्याने,योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने आणि प्रामाणिक प्रयत्नाने वेळ वाचवता येतो.
वैज्ञानिक दृष्टीकोन : उत्कृष्ट व्यक्तीमत्वासाठी माणसाचा वैज्ञानिक दृष्टीकोन महत्वाचा आहे. माणसाने दैववादि असता कामा नये.माणसाने प्रयत्नवादी असायला हवे. जीवनात मिळालेल्या गोष्टीं पेक्षा मिळविलेल्या गोष्टी जास्त आनंद प्राप्त करून देत असतात.जीवनात वैज्ञानिक दृष्टीकोन मोठे यश प्राप्त करून देतो. .
आर्थिक नियोजन : अर्थप्राप्ति ही चांगल्या मर्गानीच असावी, त्यामुळे मन:स्वास्थ्य मिळते. रात्री शांत झोप लोगते. बचतीची सवय लावून घ्यावी. आठवड्यातून एकदा दहा मिनटे जमा – खर्चाचा आढावा घ्यावा. अत्यावश्यक खर्चाची तरतूद अगोदर करावी. त्यानंतर आवश्यक खर्चाची आणि त्यानंतर अनावश्यक खर्चाची! माणसाने ऋण काढून सन साजरे करण्याचे टाळले पाहिजे. जास्त व्याजाच्या आशेने धोकादायक गुंतवणूक करू नये, आपण नियमित बचत केली तर ती बचत संकटमयी आपणास उपयोगी पडते.शरीराचे आरोग्य : आजारी पडणे कुणालाच परवडणारे नाही. ऋतूप्रमाणे आहार घ्यावा, शरीर, कपडे, घर, परिसर यांची स्वछता ठेवावी. रोज योग्य व्यायाम करावा. पुरेशी विश्रांती घ्यावी. मन: स्वस्थास जपावे. निर्व्यसनी राहावे आणि योग्य वेळी आरोग्य तपासणी करून घ्यावी. नवीन नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी शरीराचे सामर्थ्य हवे.
मन आणि बुद्धीचे आरोग्य : डोळे, नाक, कान, जीभ त्वचा या पाचध्यानेंद्रियांचा संबंध मनाशी असतो, डोळ्यांनी आनंद देणारी दृश्ये पहावी. कानांनी आनंद देणारे संगीत ऐकावे. नाकानी फुलांचा सुगंध घ्यावा. जीभेनी षदृसांचा चव घ्यावी आणि त्वचेनी मायेच्या प्रेमाचे स्पर्श अनुभवावा. त्यामुळे मनाचे आरोग्य चांगले राहते. मन प्रसन्न, उत्साही आणि कार्यशमता वाढवणारे बनते. वाचन, निरीक्षण, प्रवास करून, प्रश्न सोडवून, इतरांचे अनुभव ऐकून बुद्धीचे आरोग्य राखता येते. मग गोग्यवेली निर्णय घेवून योग्य कृती करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते.
ध्येय निश्चिती : आजचे, उद्याचे, पुढील आठवड्याचे, पुढील महिन्याचे, पुढील वर्ष्याचे, पुढील आयुष्याचे ध्येय हे हवेच, ध्येय ‘स्मार्ट’ हवे.
1 Comment. Leave new
Nice article. great tips on personality development.