stri-janm-mhanawuni Dhairya, Dharm, Mitra aur Striinn charo ki vipatti ke samay hi pariksha (Meaning: Stri janam se hi apavitra hai kintu pati ki seva karke wah …
फार पूर्वीच्या काळी सावित्रीच्या बापाने तपश्चर्या करून देवाला मुलीची मागणी घातली व देवाने ती पूर्ण केली. सावित्री म्हणजे लक्ष्मीच रूप शुभदा, कल्याणी, समृघी, सर्जनशीलता, असलेली तेजस्वी सर्व गुण संपन्न अशी मुलगी प्राप्त झाली. पण तरी लग्न काळी मोठमोठ्या धैर्यवान राजपुत्रांना तिला मागणी घालण्याच घैर्य नव्हते अश्या वेळी तिला स्व:त चा वर निवडण्याच स्वातंत्र्य वडिलान कडून मिळाले. पण वर शोघल्या नंतर तो अल्पायुषी असल्याच माहिती होवूनही आपल्या निर्णयावर अटळ राहून त्याच वरा सोबत लग्न केल व पूर्णता निभावली. केवढ हे धैर्य अश्याच कितीतरी स्त्रीया विकासाचा झेंडा फडकवून शिखरावर पोहोचल्या आहेत.
ग्रामीण भागातही आता बाईचा चेहरा बदलेला आहे. मुलामुलींना बाहेर गावी शिक्षण घेण्या करिता. पाठवून मोठ्या पदावर पोहोचविले आहे. त्या सुद्धामुलीच्या जन्मान खंतावत नाही. बाई असण्याच दु:ख मुळीच नाही. आरोग्य सेवा तसेच बचत गट या माघ्यमातून त्या पुढे जात आहे. स्व:त च्या मिळकतीवर घरसंसार कश्या प्रकारे करायचा हा प्रश्न मिटवून टाकला आहे. स्त्रीला पूर्वी वांझ पणाच्या अत्याचाराला बळी पडावे लागायचे. तेव्हा आता आधुनिक तंत्र ज्ञानाच्या प्रयोगद्वारे त्यातूनही तिचा प्रश्न सोडविल्या जावू शकतो. तेव्हा पुरातन काळातील सावित्रीच्या आख्या नातील तिच्या वडिलांची तपश्चर्या सार्थ झालीच. तेव्हा या काळातही ती सर्वतोपरी साघ्य होवू शकते म्हणूनच म्हणावेसे वाटते माणसाचे मुल-ते-माणसाचेच मुलगी असो-वा-मुलगा स्वीकार व्हायलाच हवा.