वादग्रस्त अंतरिक्ष-देवास व्यवहार प्रकरणी नियंत्रक व महालेखा परीक्षकांनी (कॅग) अंतराळ संशोधन विभागावर ताशेरे ओढताना विशेषकरून माजी सचिव जी. माधवन नायर यांची जोरदार कानउघाडणी केली आहे.
या व्यवहारात एका खासगी कंपनीला झुकते माप देण्यासाठी नायर यांनी सर्व नियम आणि धोरण धाब्यावर बसवले. सत्य स्थिती लपवून ठेवली असल्याचे कॅगच्या अहवालात म्हटले आहे. अंतरिक्ष-देवास व्यवहार म्हणजे प्रशासनातील कारभारातील अपयश व ढिलाईचे उत्तम उदाहरण असल्याचे कॅगने म्हटले आहे.