१६ ऑक्टोबर रोजी सैफ-करीना लग्नबंधनात अडकण्याची शक्यता |
![]() |
बॉलिवूडमधील स्टार कपल सैफ अली खान आणि करीना कपूर येत्या १६ ऑक्टोबर रोजी लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे. सैफ सध्या तुर्कीमध्ये ‘रेस २’ या चित्रपटाचे चित्रीकरणात करण्यात व्यस्त आहे, आणि त्याला कंपनी देण्यासाठी करीनाही तिकडे उपस्थित आहे. सध्याच्या चर्चेनुसार सैफचे हे चित्रीकरण आटोपल्यानंतर दोघेही १६ ऑक्टोबर रोजी लग्न करणार आहेत. लौकरच ते याविषयीची अधिकृत घोषणा करतील. गेली अनेक वर्षे एकत्र असणा-या सैफ आणि करीना एजंट विनोद या त्यांचा चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर लग्न करतील, अशी चर्चा गेले काही दिवस सुरू होती. मात्र खुद्द करीनानेच आपण या वर्षात लग्न करणार असल्याचे सांगितले आहे. Source :Marathi Online |