sadgurunche-wichar for marathi articles
शुभ कर्मे करणे म्हणजे हि सुखी जीवनाची गुरुकिल्ली होय. सत्कर्मे निरनिराळ्या प्रकारची असू शकतात. अन्नदान, नेत्रदान, श्रमदान, वस्त्रदान, रक्तदान, द्रव्यदान, देहदान, नामदान, ज्ञानदान. हे दा नाचे प्रकार आहेत. अश्या प्रकारे दान करून मनुष्य आपल्या दिव्य बँकेत पुण्य जमा करू शकतो. पण दानशूरपणा कोणी कुठल्या बाबतीत दाखवावा हे ज्याच्या त्याच्या कुवतीवर अवलंबून असते. ज्यांना स्वत:चे कुटुंबाचे पालन करण्या ईतकी सुद्धा कमाई करता येत नाही. त्यांनी ईतरांना द्रव्य-दान करणे म्हणजे मूर्खपणाच होय. जे स्वत :अक्षर शत्रू आहेत त्यांनी ईतरांना ज्ञान देणे म्हणजे शुद्ध आचरटपणा आहे.जे स्वत : नित्य नामस्मरण करीत नाही त्यांनी ईतरांना नामस्मरण करण्यास सांगणे म्हणजे शुद्ध ढोंगीपणा आहे. तेव्हा सत्कर्म किंवा दानशूरपणा करण्याअगोदर ज्याने त्याने आपले सामर्थ्य तपासून पाहणे चांगले.
श्रेष्ठदान
सर्व प्रकारचे दान हे आपापल्या परी सर्व श्रेष्ठच आहेत त्याना कमी लेखण्याचा मानस नाही. परंतु हि सर्व दाने ज्यांच्या साठी केली जातात त्यांचे शाश्वत कल्याण साधण्याचे सामर्थ त्या प्रकारच्या दानात नाही. ज्ञानदानाचे या उलट आहे. ज्ञानदानाने लोकांचे शाश्वत कल्याण साधले जाते म्हणूनच ज्ञानदान हे सर्व दानांच्या प्रकारात श्रेष्ठ ठरते. ज्ञानदान करून अनेक लोकांना अचूक मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या कल्याणाचा मार्ग दाखविणारे विचारवंत हे खरोखरच समाजाचे भूषण होत. त्याच प्रमाणे नामदान हे सुद्धा श्रेष्ठ दान आहे. नामस्मरणचा म्हणजेच ईश्वर चिंतनाचा महिमा जगातील सर्व विचारवंतांनी एक मुखाने वर्णन केलेला आहे. नामस्मरण करून व नामस्मरणाच्या महतीची स्वत प्रचीती अनुभवून इतरांस नामस्मरण करण्यास प्रववृत्त करणारी व्यक्ती समाज पुरुषांचे अलंकार होत. म्हणून लोकांना ज्ञानदाना द्वारे नामस्मरण करण्यास उद्युक्त करणे व त्यांच्या कल्याणाचा व हिताचा अचूक मार्ग दाखविणे.हा पुण्य सम्पादन करण्याचा उत्कृष्ठ मार्ग आहे. म्हणूनच ज्ञानदान व नामदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे.
सदगुरूंचे विचार–
Source : Marathi Unlimited
2 Comments. Leave new
I LIKE
IT
nice article i really like it…