वाघांच्या अवयवांची किंमत

Like Like Love Haha Wow Sad Angry वाघाची किंमत फार अमूल्य आहे. त्याचे उपगोय ओषधी करिता करण्यात येते. भारतात पुरातन...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

tigers tuskarsवाघाची किंमत फार अमूल्य आहे. त्याचे उपगोय ओषधी करिता करण्यात येते. भारतात पुरातन काळापासूनच वाघांची तस्करी करण्यात यात आहे. त्यामुळेच आज भारतात फक्त १०००+ वाघ उरलेले आहेत. उल्लेखनीय हे कि वाघ फार अमूल्य असून त्याचे विदेशी बाजारात मोठ्या प्रमाणात पैसे दिले जातात. खाली आपण बघूया वाघांच्या अवयवांची किंमत.

हाडे –

किंमत ६000 डॉलर प्रतिकिलो (३ लाख ३६ हजार रुपये)

वाघाच्या अवयवांमध्ये त्याच्या हाडांना सर्वाधिक मागणी आहे. चीनमधील १00 प्रकारच्या पारंपरिक औषधांमध्ये वाघाच्या हाडांची भुकटी वापरली जाते. याशिवाय मद्यामध्ये सुद्धा तिचा वापर होतो. शरीरातील गाठी, अशक्तपणा, डोकेदुखी, हातपाय अकडणे, कंबर व पायांमधील अर्धांगवायू आदी रोगांपासून मुक्ती देण्याची शक्ती वाघांच्या हाडांमध्ये असल्याचा समज आहे.

रक्त –

किंमत ६00 डॉलर प्रति

लिटर (३४ हजार रुपये)

विष्ठा- शरीर भाजल्यास याचा

मलमाप्रमाणे वापर केला जातो.

कातडे –

किंमत २0 ते २५ हजार डॉलर (१४ लाख ९ हजार रुपये)

कातडीपासून निर्मित वस्त्र परिधान करणे हा ‘स्टेटस सिम्बॉल’ मानला जातो. वाघाच्या कातडीवर बसून धार्मिक विधी केल्यास फलप्राप्ती होते, अशी धारणा आहे. घराच्या पडवीत वाघाची कातडी असणे हे श्रीमंतीचे लक्षण मानले जाते. कातडीवर थोडा वेळ बसल्यास मानसिक रोग बरे होतात, ताप उतरतो अशी श्रद्धा आहे.

शेपटी –

किंमत ६00

डॉलरची एक शेपटी

(३४ हजार रुपये)

या शेपटीची भुकटी त्वचारोगांवर उपचारासाठी

वापरली जाते.

पंजा(वाघ नखे)-

किंमत ४८0 डॉलर प्रति पंजा (२७ हजार रुपये)

अनिद्रा आणि इतर मानसिक आजारांवर उपचारासाठी तयार केल्या जाणार्‍या औषधांमध्ये वाघनखांचा वापर केला जातो.

लिंग –

किंमत २७,000 डॉलर प्रति १0 ग्रॅम (१५ लाख २२ हजार रुपये)

कामोत्तेजना वाढविण्याच्या औषधात याचा वापर होतो.

खोपडी –

किंमत एक हजार डॉलर (६५ हजार रुपये)

यामुळे मनुष्याला जादूई शक्ती प्राप्त होते.

पित्ताशय –

किंमत ४00 डॉलर (२३ हजार रुपये)

मुलांना होणारा मेंदुज्वर बरा करण्यासाठी याचा वापर होतो.

मिशीचे केस-

किंमत १00 डॉलर (५,५00 रुपये)

चरबी –

किंमत ४00 डॉलर प्रति किलो (२३ हजार रुपये)

वाघाचे मांस आणि चरबी वातावरील उपचारासाठी वापरली जाते. याशिवाय वांत्या आणि रक्तस्राव थांबविण्यासाठी तसेच कुत्रा चावल्यास ती उपयुक्त मानली जाते.

डोळे –

किंमत २५0 ते ३00 डॉलर प्रतिजोडी (१७ हजार रुपये)

मिर्गी, मलेरियावर उपचारासाठी निर्मित औषधात या डोळ्यांचा वापर होते.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories