Paneer Potato Loaf :
This is a different recipe which you have ever heard. It required 1/2 kg Potatoes, Garam Masala, Chili sos, 1 chopped onion, 2 t-spoon ghee, Paneer etc. Below is the procedure to prepare paneer potato loaf.
साहित्य – आर्धा किलो बटाटे, छोडा लिंबू रस, चवी नुसार मीठ,चार ब्रेड स्लाईड चे क्रम्स, मुठभर चिरलेली कोथिंबीर अर्धा टीस्पून गरम मसाला. जिरेपूड, चिलीसॉस साधासोस एक कांदा बारीक चिरलेला. दोन टेबलस्पून तूप, एक कप किसलेलं चीज, दोनशे ग्रॅम पनीर.
कृती – पनीरचे मोठे चौकोणी तुकडे करावे. कढईत छोडे तेल घेऊन कांदा परतून घ्यावा फक्त मऊ झाला कि बस. त्याच तुपात पनीरचे तुकडे परतावेत व त्यावर चिलीसॉस चिमुट भर मीठ व टोमॉंटोसॉस टाकून कोरडे होईपर्यंत परतावं. दरम्यान बटाटे उकडून घ्यावे. सोलून कुस्करावे, त्यात लिंबाचा रस, मीठ, अर्धे ब्रेडक्रम्स, कोथिंबीर, गरम मसाला, जिरेपूड आणि पाऊन कप चीज घालाव. परतलेला कांदा घालून मिश्रण मऊ मळाव. आता एका भांड्याला तूप लाऊन त्यात अर्ध मिश्रण पसराव. त्यावर पनीरचे तुकडे पसरावेत व त्यावर उरलेले बटाट्याच मिश्रण घालून दाबाव. वरून ब्रेड क्रम्स पसरवून त्यावरचीज पसरवाव. पुन्हा दाबावं. मध्यम [ एकशे ऐंशी अंश सें.] आचेवर वीस ते तीस मिनिट भाजाव.
Source :
Marathi Unlimited
हेमावती म. भेंडारकर. नागपूर ९