मूळ टायटॅनिक जहाज बुडाल्याच्या घटनेला नुकतीच १00 वर्षे झाली असताना, ऑस्ट्रेलियातील अब्जाधीश क्लाईव्ह पामर हे चिनी कंपनीच्या मदतीने टायटॅनिकची प्रतिकृती उभारणार असून, २0१६ साली टायटॅनिक-२ हे जहाज इंग्लंड ते न्यूयॉर्क असा प्रवास करील, अशी घोषणा पामर यांनी केली आहे.
चिनी कंपनी सीएससी जिनलिंग यांच्याशी क्लाईव्ह पामर यांनी करार केला असून, टायटॅनिक-२ बांधण्याबाबतच्या सामंजस्य करारावर दोन्ही पक्षांतर्फे स्वाक्षर्या करण्यात आल्या आहेत. टायटॅनिक-२ हे जहाज पहिल्या जहाजाइतकेच शानदार असेल; पण त्यात २१ व्या शतकाची नौदल व सुरक्षाप्रणाली असेल, असे पामर यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
Leave a Reply