दुष्काळाच्या झळा सोसणार्या महाराष्ट्राला दिलासा देणारी बातमी असून, यंदा मान्सून वेळेत म्हणजे १ जूनला केरळात दाखल होईल. पुढे त्याचा प्रवास ठरल्याप्रमाणे झाला तर तो राज्यात ५ जूनला आणि मुंबईत १0 जूनला धडकेल, अशी माहिती मुंबई वेधशाळेचे शस्त्रज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिली.
आयएमडीच्या शास्त्रज्ञांनी ऑपरेशनल मॉडेल्सच्या माध्यमातून केलेल्या अभ्यासानुसार जून ते सप्टेंबर या काळात भारतात सरासरीएवढा पाऊस होईल.