मोनोरेलच्या मार्गातील वडाळा-चेंबूर या पहिल्या टप्प्यातील बरेच कामकाज पूर्ण झाले असून, डिसेंबरमध्ये मोनो मुंबईकरांच्या सेवेत हजर होईल.
शहर विकास आढाव्याचे नियोजन झालेले नाही. त्यामुळेही काही समस्या आहेत. मात्र यासाठी महापालिकेला दोष देण्याची गरज नाही. मोनोरेलचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसरा टप्पा पूर्ण होण्यासाठी आणखी एक वर्ष लागेल. पहिल्या टप्प्यातील काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण झाल्यानंतर ‘कर्मशियल ऑपरेशन’ सुरू करण्यात येणार असल्याचे महानगर आयुक्त राहुल अस्थाना यांनी आणि अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले.
‘मोअर कार्ड’साठी मोनो-मेट्रो-बेस्ट आणि रेल्वेचा प्राधान्याने विचार करण्यात येत आहे. मात्र रेल्वे प्रशासनाने अद्याप याबाबत सकारात्मक उत्तर दिलेले नाही. ‘मोअर कार्ड’ राबवण्यासाठी एक समितीही नेमण्यात येणार आहे.
– मुंबईकरांच्या सेवेत उतरण्यासाठी मोनोरेलला डिसेंबर २0१२ चा मुहूर्त उजाडणार असला, तरी वडाळा कारशेडमध्ये घेण्यात आलेल्या चाचणीदरम्यान भक्ती पार्क स्थानकापर्यंत धावलेली हिरव्या रंगाची मोनोरेल मुंबईकरांचे विशेष आकर्षण ठरली.