म्हाडाच्या वतीने ३१ मे रोजी काढण्यात येणार्या २ हजार ५९३ घरांसाठी आज जाहीरात प्रसिद्ध होत असून लॉटरीदरम्यान अर्जदारांची फसवणूक करणार्या दलालांपासून सावध राहावे, असा इशारा प्राधिकरणाने दिला आहे.
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने या योजनेतील सदनिकांच्या वितरणासाठी किंवा याबाबतच्या कोणत्याही कामासाठी कोणालाही प्रतिनिधी/सल्ला देणारा अथवा प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदारास कोणी दलाल/व्यक्ती परस्पर म्हाडाच्या नावे पैसे उकळणे किंवा फसवणूक करणे इत्यादी बाबी करताना आढळल्यास मुख्य दक्षता, सुरक्षा अधिकारी यांना कळवावे, असे म्हाडाने म्हटले आहे. ऑनलाईन अर्ज अर्जदारांतर्फे भरणे व सादर करणे यासाठी लागणारे सॉफ्टवेअर विकसित करून घेण्यात आले आहे. सॉफ्टेवअरच्या गुणात्मक दर्जाबाबत पवई आयआयटी या केंद्र शासकीय संस्थेने प्रमाणपत्र दिले आहे. संकेतस्थळावर अर्जदाराला मराठी आणि इंग्रजी या भाषांमध्ये अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. प्रिटेंड रिसिट बँकेमध्ये सादर करण्यापूर्वी माहिती टाईप करताना चूक झाली आहे, असे वाटल्यास अर्जदार पहिला अर्ज दुलक्र्षित करून नव्याने ऑनलाईन अर्ज करू शकणार आहे.