kundalini-jagruti, This Self-realization workshop provides you with a simple, first-time experience of Sahaja Yoga Meditation and Kundalini jagruti
एखादा तापमापक [ थर्मामीटर] आपण डोळ्या समोर आणला तर त्याच्या तळाशी पाय असतो व तो वर जाण्या साठी काचेच्या नळीत जागा ठेवलेली असते. आपल्या शरीर यंत्रणेतील नाड्या-चक्रे-कुंडलिनी हि यंत्रणा सुध्दा अशीच असते. पाऱ्याप्रमाणेच कुंडलिनी हि मेरू दंडाच्या तळाशीअसलेली सुप्त शक्ती आहे. नाड्यांतून तिला वर चढायला मार्ग दिलेला आहे.
चक्रे हि एक प्रकारची छोटी साधने किंवा उपकरणे या मार्गात बसवलेली आहेत. उष्णता मिळाल्याबरोबर पार प्रसरण पावतो व वर चढतो. जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा कुंडलिनी जागृत होते आणि वर सरकते. मध्यवर्ती अशा सुशुन्मा नाडींतून ती वर चढते व मार्गातील प्रत्येक चक्राला ती शक्ती पुरविते. त्यामुळे ती चक्रे बटन दाबल्या प्रमाणे कार्यान्वित होतात. ध्यानातून जी शांतता निर्माण होते त्यामुळे त्यामुळे अनेक आध्यात्मिक प्रक्रियांना सुरवात होते.कुंडलिनीची जागृती हि सुध्दा अश्या प्रक्रियापैकी एक आहे.
स्वामी कृष्णानंद .