क्षय मास.
एका महिन्यात दोन संक्रांती येतात तेंव्हा क्षयमास होतो कार्तिक, मार्गशीर्ष किंवा पौष या ती महिन्यान पैकी एकदा क्षयमास असतो. याचे कारण असे आहे कि, या तीन महिन्यात सूर्याची गती शीघ्र असते: म्हणून वृश्चिक धनु आणि मकर या तीन राशी चालून जाण्यास सूर्यास नेहमी प्रमाणे तीस दिवस न लागतां कधी कधी कमी काळ पुरतो. अश्या वेळेस एका महिन्यांत दोन संक्रांती येण्याचा संभव कधी कधी असतो, म्हणून क्षयमास होतो.क्षयमास येतो तेंव्हा क्षयमासाच्या पूर्वी एक आणि क्षया नंतर एक असे दोन अधिक महिने येतात, व त्या वर्षी तेरा महिन्याचे वर्ष असते. क्षयमास एकदा येऊन गेला म्हणजे बहुत करून १४१ वर्षांनी किंवा १९ वर्षांनी पुन: येतो ज्योतीर्मयुख पाचवी आवृत्ती मधून.
Source : Marathi Unlimited.