शस्त्रांच्या आयातीत भारत चीनच्याही पुढे |
![]() |
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रीसर्च इन्स्टिट्यूट, इंडियाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात, २00७ ते ११ दरम्यान भारताने संपूर्ण जगाच्या शस्त्र खरेदीच्या तुलनेत १0 टक्के खरेदी केली असून, चीनने फक्त ५ टक्के शस्त्र खरेदी केली असल्याचे संरक्षण मंत्री ए. के. अँन्टोनी यांनी सभागृहास सांगतिले.
भारत शस्त्र आयातीत चीनच्या तुलनेत कुठे आहे, या प्रश्नाच्या उत्तरावर त्यांनी ही माहिती दिली. शस्त्रांचा तुटवडा भरून काढण्यासाठी त्यांची आयात आणि स्वदेशी उत्पादित शस्त्रे असे दोन मार्ग असतात. सैन्य दलाला वेळोवेळी लागणारी शस्त्रे गरजेनुसार मागविली जातात. ही खरेदी १५ वर्षांसाठी एलटीआयपीपी, ५ वर्षांसाठी एससीएपी व एक वर्षासाठी एएपी या योजनेअंतर्गत खरेदी केली जातात. |