आपल्या शरीरातील नाड्या व त्यांचे कार्य:
आपल्या शरीरात जश्या रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या असतात.तश्या अध्यात्मिक शक्ती वाहून नेणाऱ्या सूक्ष्म वाहिन्याही असतात. त्यांना नाड्या असे म्हणतात. नद्यांमुळे आपल्याला प्राण शक्तीचा पुरवठा होतो. प्राण शक्ति हि असी अध्यात्मिक शक्ती आहे, जी सूर्या पासून येते.नाड्या हि शक्ती आपल्या शरीर यंत्रणेत सगळीकडे प्रसारित करतात.
आपल्या सूक्ष्म देहामध्ये ७२ नाड्या असतात. यापैकी तीन प्रमुख नाड्या असतात. आपल्या मणक्याच्या तळापासून या नाड्या सुरु होऊन डोक्या पर्यंत पाठीच्या कन्या सोबत जातात. मणक्याच्या डाव्या बाजूने जाणाऱ्या नाडीला चंद्र नाडी असे म्हणतात. ऊजव्या बाजूने जाणाऱ्या नाडीला सूर्य नाडी असे म्हणतात.या दोन्ही नाड्यांना अनुक्रमे इडा व पिंगला अशीही नावे आहेत.या दोन्ही नाड्यांच्या मध्यातून एक नाडी वर येते तिला सुषुम्ना असे नाव आहे.ह्या तिन्ही नाड्यांतून वाहणारा प्राण शक्तीचा प्रवाह एक सारखा नसतो.जेव्हा एखाद्या नाडीतप्राण शक्तीचा प्रवाह जास्त असतो,तेव्हा ती नाडी कार्यान्वित झालेली असते. तेव्हा ती बौध्दिक कार्यांना मदत करते.जेव्हा सूशुन्मा नाडी कार्यान्वित होते तेव्हा अध्यात्मिक कार्यात त्याचा फायदा होतो. वेगवेगळ्या नाड्या क्रमाने कार्यान्वित होतात. प्रयेक व्यक्तीमध्ये त्याच्या अध्यात्मिक अवस्थे प्रमाणे कमीजास्त प्रमाणात वेगवेगळ्या नाड्या कार्यान्वित होतात.आपण ज्यावेळी जी नाडी कार्यरत असेल, त्या प्रमाणे लक्ष ठेवून त्या विशिष्ट प्रकारचे कार्य केले पाहिजे.म्हणजे आपले ते कार्य अधिक चांगल्याप्रकारे पार पडते. हि गोष्ट लक्षात न घेतल्यामुळे आपल्या कार्यात अडथळे निर्माण होतात. हे सुद्धा एक कारण असू शकते. की सारखेच प्रयत्न करून सुद्धा काही वेळ आपले ध्यान उत्तम होते,तर ईतर काहीवेळा मात्र तेवढे चांगले होत नाही, हे सुद्धा त्याचे कारण असू शकते.
स्वामी कृष्णानंद