Human kundalini energy through human body The focus of recent studies has been the activation or ‘awakening’ of the Kundalini Shakti, the inner potential energy that …
मणक्याच्या तळाशी एक सुप्त शक्ती वास करीत असते .तिला कुंडलिनी म्हणतात. हि शक्ती जर जागृत झाली तर नराचे रुपांतर नारायणात होते. ईतकी हिशक्ती महत्वाची आहे.हि सक्ती जागृत झाली असता मेंदूत नवीन पेशी उत्पन्न होतात. आपल्या आंतरिक क्षमता वाढीला लागतात. आपल्या जाणीवेच्या कक्षा अमर्याद प्रमाणात विस्तार पावतात. आपल्या अंगी देवत्व येते.अनेक सिद्धि प्राप्त होतात.कुंडलिनी शक्तीला जागृत करण्या साठी अनेक तंत्रे आहेत. काही तंत्रे अध्यात्मिक प्रक्रियांचे कार्य पूर्ण होण्यापूर्वीच कुंडलिनी जागृत करतात. अश्या वेळी मिळालेल्या सिद्धीचा दुरुपयोग होऊ शकतो. ध्यान योगात कुंडलिनी हळूहळू योग्य वेळेवर जागृत होते. अश्या वेळी साधकांची सर्व क्षेत्रात आध्यात्मिक प्रगती झाल्या मूळे तो मिळालेल्या सिद्धीचा कधीही दुरुपयोग करत नाही. कुंडलीनीची जागृती हळूहळू झाल्या मूळे आपल्या रोजच्या नैसर्गिक जीवनाचा प्रवाहहि प्रभावित होत नाही. जागृतीची क्रिया चालू असताना भीती, वेदना किंवा कुठलीही ईजा होणार नाही.जर कुंडलिनी, एकाएकी अवेळी जागृत झाली, कधीकधी मेंदूच्या पेशीचे नुकसान होते.व मानसिक अस्थिरता येवू शकते
कुंडलिनी हा फार आकर्षक विषय आहे. साधकाला त्याबद्धल उसुकता असू शकते.या विषयावर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत.पण हि पुस्तके वाचून, स्वत :हून प्रयोग करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. त्याचे परिणाम फार गंभीर स्वरूपाचे होतील.प्रत्त्येकाने हि गोष्ठ लक्षात ठेवली पाहिजे,कि कोणतीही अध्यात्मिक साधना करताना,उच्च प्रकारच्या आध्यात्मिक शक्ती संपर्कात येतात. या शक्तींशी आपण निष्काळजी पूर्वक खेळ करू नये. त्याचे परिणाम गंभीर स्वरूपाचे होतील,म्हणूनच आध्यात्मिक प्रवासात गुरूची नितांत आवशकता असते.
स्वामी कृष्णानंद —–