शेतकर्‍यांच्या आत्महत्यांत घट




Like
Like Love Haha Wow Sad Angry

शेतकर्‍यांच्या आत्महत्यांत घट

सरकारने विविध उपाययोजना केल्याने शेतकर्‍यांच्या आत्महत्या कमी झाल्या आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात शेतकर्‍यांच्या आत्महत्या घटल्या आहेत. उत्तर प्रदेशात तर गेल्या वर्षी एकही आत्महत्या झालेली नाही. शेतकर्‍यांना आरबीआय, नाबार्ड कमी व्याजदरावर कर्ज पुरवठा करीत आहे. राष्ट्रीयकृत बँकांद्वारे शेतकर्‍यांना सात टक्के व्याजदराने कर्ज दिले जात आहे, असे अर्थ राज्यमंत्री नमो नारायण मीना यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

कर्ज, नापिकी, दुष्काळ, सामाजिक-आर्थिक आणि वैयक्तिक आदी आत्महत्येची कारणे आहेत. आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्रातील ३१ जिल्ह्यांना पुनर्वास पॅकेज देण्यात आले आहेत. त्या अंतर्गत ३0 सप्टेंबर २0११ पर्यंत १९,९९८.८५ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu