विख्यात बंगाली चित्रपट अभिनेता सौमित्र चटर्जी यांना आज भारतीय सिनेमाचा सर्वोच्च सन्मान असलेला दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनला ‘डर्टी पिक्चर’ चित्रपटातील भूमिकेसाठी पुरस्कार देण्यात आला. सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार गिरीश कुलकर्णी (देऊळ) यांना देण्यात आला.
विद्याचे ‘क्लीन पिक्चर’
‘डर्टी पिक्चर’ चित्रपटाने प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री विद्या बालन केंद्र सरकारच्या सार्वजनिक स्वच्छता अभियानाच्या जाहिरातीमध्ये काम करणार आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छता अभियानाविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी विद्या बालन यांना मोहिमेचे ब्रॅण्ड अँम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.