संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आपल्या कवितांसह आपल्या लिखाणाद्वारे प्रेरणा देणारे ज्येष्ठ कवी व लेखक बाबुराव सरनाईक (बाबूजी) यांना येथील महाराष्ट्र पुरोगामी मुस्लिम समाज संघटनेने ‘महाराष्ट्र नायक’ पुरस्कार देऊन आज सन्मानित केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांच्या कार्याची आठवण ठेवून आजच्या महाराष्ट्र दिनी बाबुजींना ‘महाराष्ट्र नायक’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पुरोगामी मुस्लिम समाज संघटनेचे संस्थापक आसद चाऊस यांनी घरी जाऊन बाबुजींची प्रत्यक्ष भेट घेत त्यांना महाराष्ट्र नायक या पुरस्काराने सन्मानित केले.
1 Comment. Leave new
congrats dada.